
सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित ३१०० वा दिवस
कुणीही सत्य, प्रेम आणि निष्कपटता यांच्या शक्तीला रोधू शकणार नाही. तुम्ही सच्चा दिलाचे आहात काय? मरण आले तरी तुम्ही निःस्वार्थ राहू शकता काय? तुमचे हृदय प्रेमाने भरले आहे काय? जर असे असेल तर तुम्ही कुणालाही, एवढेच नव्हे तर मृत्यूलाही भिण्याचे कारण नाही. वत्सांनो, पुढे चला! साऱ्या जगताला ज्ञानाच्या प्रकाशाची आवश्यकता आहे. हा प्रकाश मिळविण्यासाठी ते मोठ्या उत्सुकतेने आपल्याकडे पाहत आहे. केवळ भारतापाशीच हा ज्ञानाचा प्रकाश आहे. तो इंद्रजाल, जादू वा भोंदूगिरी यामधे नसून धर्माच्या खऱ्या स्वरूपासंबंधीच्या सर्वोच्च आध्यात्मिक सत्यांच्या महान् उपदेशात तो सामावलेला आहे.
*स्वामी विवेकानंद...*
●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●
★ भारतीय सौर ४ अग्रहायण शके १९४७
★ मार्गशीर्ष शुध्द /शुक्ल ५
★ शालिवाहन शके १९४७
★ शिवशक ३५१
★ विक्रम सम्वत् २०८२
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ मंगळवार दि. २५ नोव्हेंबर २०२५
★ १९६२ संत चरित्र रचीता, आधुनिक महाराष्ट्राचे महिपती, संतकवी, कीर्तनकार, गणेश दत्तात्रेय सहस्रबुद्धे ऊर्फ दासगणू महाराज यांचा स्मृतिदिन
★ १९८४ महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री, भारताचे उपपंतप्रधान, संरक्षणमंत्री, यशवंतराव चव्हाण यांचा स्मृतीदिन
★ १९९७ दैनिक लोकमतचे संस्थापक, संपादक, माजीमंत्री व स्वातंत्र्य सेनानी जवाहरलालजी दर्डा यांचा स्मृतीदिन
★ आंतरराष्ट्रीय महिला हिंसाचार विरोधी दिन.
✍️ विवेकानंदांचे जाज्वल्य, प्रेरणादायी व अनुकरणीय असे मनुष्य निर्माणाचे व राष्ट्राच्या पुनरुत्थानाचे विचार नियमित व अखंडितपणे गत आठ वर्षांपासून (३१ मे २०१७) पासून आपल्या पर्यंत पोहचविण्याचा सातत्यपूर्ण संकल्पाचा ३१०० वा दिवस आहे. हे वैचारिक अग्नीहोत्र असेच सतत तेवत रहावे यासाठी ठाकूरांच्या, स्वामीजींच्या चरणी प्रार्थना व आपल्या सर्वांच्या शुभाशिर्वादाची अपेक्षा…
प्रा. अमोल श्रीकृष्ण अहिरे विवेकानंद विचारदूत 9921976422
