

सिन्नर (प्रतिनिधी )२३ नोव्हेंबर २०२५ वनस्पतीशास्त्रज्ञ डाॅ.जगदीशचंद्र बोस यांच्या ८८ व्या स्मृतिदिन महामित्र परिवार व आद्यक्रांतिकारक राघोजी ब्रिगेड यांच्या सिन्नर येथे अभिवादन करण्यात आले
यावेळी डाॅ.जगदीशचंद्र बोस यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले
या कार्यक्रमाचे अध्यक्ष महामित्र दत्ता वायचळे म्हणाले की.लहानपणापासूनच बोस यांना निसर्गाच्या सानिध्यात राहण्याची खूप आवड होती. यानिमित्ताने त्यांची जीवशास्त्रातील आवड जागृत झाली. वयाच्या 11 व्या वर्षी ते कलकत्त्याला आले आणि त्यांनी सेंट झेवियर्स शाळेत प्रवेश घेतला. यानंतर ते लंडनला वैद्यकीय शास्त्राचे शिक्षण घेण्यासाठी गेले. त्यांनी भौतिकशास्त्राचा अभ्यास केला.शिकवण्याचे समर्पण बोस 1885 मध्ये भारतात आल्यानंतर प्रेसिडेन्सी कॉलेज, कलकत्ता येथे सहाय्यक प्राध्यापक म्हणून शिकवू लागले. इंग्रजी प्राध्यापकांच्या तुलनेत भारतीय प्राध्यापकांच्या कमी पगाराला विरोध केल्याने त्यांनी तीन वर्षे विना वेतन अध्यापन केले, पण त्यांनी शिकवणे सोडले जगदीशचंद्र बोस यांनी कॅस्कोग्राफ नावाच्या उपकरणाचा शोध लावला. ते परिसरातील विविध लहरी मोजू शकत होते. पुढे त्यांनी प्रयोगातून सिद्ध केले की झाडांमध्ये आणि वनस्पतींमध्ये जीवन असते. ते सिद्ध करण्याचा हा प्रयोग रॉयल सोसायटीत झाला आणि त्याच्या या शोधाचे जगभरात कौतुक झाले. रेडिओ कम्युनिकेशनचे जनक वैज्ञानिक विभागात असे मानले जाते की बोस यांच्या वायरलेस रेडिओसारख्या उपकरणातूनच रेडिओ विकसित केला गेला. पण स्वतःच्या नावावर पेटंट झाल्यामुळे रेडिओच्या शोधाचे श्रेय इटालियन शास्त्रज्ञ जी. मार्कोनी यांना जाते. मार्कोनी यांना या शोधाबद्दल 1909 चा भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक मिळाले.त्यानंतर बोस सर जगदीश चंद्र बोस म्हणून ओळखले जाऊ लागले. 23 नोव्हेंबर 1937 रोजी वयाच्या 78 व्या वर्षी त्यांचे निधन झाले.
अशा भारतीय जीवशास्त्राचे भौतिकशास्त्रज्ञ ,वनस्पतशास्त्रज्ञ आणि पुरातत्त्व डाॅ.जगदीशचंद्र बोस यांना विनम्र अभिवादन
या कार्यक्रमाचे सुञसंचलन आकाश धोंगडे यांनी केले.व प्रास्ताविक विजय मुठे यांनी केले.तर आभार सुनिल सावंत यांनी मानले
याप्रसंगी महामित्र दत्ता वायचळे, आद्यक्रांतीकारक राघोजी ब्रिगेड विजय मुठे,सुनिल सावंत ,संदिप मुठे, आकाश धोंगडे,भास्कर लोंढे,किरण मुठे,रोहित मुठे, गणेश टेकनर, सुरज तळपे,रितेश बिन्नर आदि उपस्थित होते
