

जळगाव निंबायती (वार्ताहर) नुकताच संपन्न झालेल्या १७ वर्षाखालील मुलांच्या राज्यस्तरीय शालेय भारोत्तोलन (वेटलिफ्टिंग) स्पर्धेत अहिल्यादेवी शिक्षण संस्थेच्या गोविंदराव यशवंतराव पाटील विद्यालयाच्या कृष्णा संजय व्यवहारे याने ६५ किलो वजनी गटात चुरशीच्या लढतीत १११ किलो स्न्यच, १३० किलो क्लीन जर्क, असे एकूण २४१ किलो वजन उचलून सुवर्णपदक पटकावले. कृष्णाची इटानगर अरुणाचल प्रदेश येथे २६ ते ३० नोव्हेंबर २०२५ दरम्यान होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्र राज्य शालेय भारोत्तोलन (वेटलिफ्टिंग) संघात निवड करण्यात आली आहे, तसेच अक्षरा सुहास व्यवहारे हिने मुलींच्या स्पर्धेत ६९ किलो वजनी गटात कांस्यपदक पटकावले ८६ किलो वजनी गटात सृष्टी राहुल बागुल हिने चौथा क्रमांक मिळविला यशस्वी खेळाडूंना प्रशिक्षक प्रवीण व्यवहारे यांचे मार्गदर्शन लाभले. सर्व यशस्वी खेळाडूंचे अहिल्यादेवी शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती कासूताई पाटील, सचिव महेंद्र पाटील, समन्वयक निंबाजी शिंदे, सर्व संचालक, विश्वस्त, पदाधिकारी, प्राचार्य पी. एन. पवार, पर्यवेक्षक व्ही. डी. काळे, सर्व प्राध्यापक, शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारींसह ग्रामस्थ व विद्यार्थ्यांनी अभिनंदन करुन पुढील वाटचालीसाठी सुयश चिंतले आहे.
