
जिल्हाधिकारी यांना निवेदन देतानां आमदार हिरामण खोसकर यांचेसह शेतकरी कृती समिती अध्यक्ष नागेश गायकर, अँड.अरुण पोरजे, अँड. रतन इचम, सचिव गोरख वाजे सह पदाधिकारी (छाया – नवनाथ गायकर, आहुर्ली)
अन्याय करु नका – आमदार हिरामण खोसकर यांची मागणी
ईगतपुरी तालुका प्रतिनिधी- नवनाथ गायकरयांजकडुन-
घोटी ते त्रंबकेश्वर प्रस्तावित राष्ट्रीय महामार्ग कामामुळे बाधित होणारे शेतकरी व रहिवासी यांचेवर अन्याय होऊ देणार नाही. या बाबत लवकरच सकारात्मक तोडगा काढु असे ठोस आश्वासन नाशिक जिल्हाधिकारी यांनी दिले आहे.
आहुर्ली येथे या रस्त्यामुळे बाधित प्रकल्पग्रस्ताचें साखळी उपोषण सुरु आहे.या उपोषणाला आज अकरा दिवस झाले आहेत.
दरम्यान आमदार हिरामन खोसकर यांनी या प्रकरणी मध्यस्थी करत जिल्हाधिकारी व प्रांत यांचेशी कृती समितीचे शिष्टमंडळ पदाधिकारी यांची भेट घडवुन आणली.
या भेटीत प्रशासनाने अतिशय सकारात्मक भुमिका घेतली. जिल्हाधिकारी आयुष शर्मा यांनी शिष्टमंडळास आश्वस्त केले कि शासन व प्रशासन बाधिताचें म्हणणे ऐकुन घेईल व यावर योग्य व न्यायपुर्ण मार्ग काढेल. कुणावर अन्याय होणार नाही याची आम्ही काळजी घेऊ.
आमदार हिरामण खोसकर यांनी या वेळी ईगतपुरी तालुक्याची विदारक परिस्थिती वर्णन करत हया तालुक्याची अवस्था बिकट झाल्याचे सांगितले.
कृती समितीचे अध्यक्ष नागेश गायकर, अँड.अरुण पोरजे, अँड. रतनकुमार इचम, सचिव गोरख वाजे आदीनीं यावेळी बाधिताचें वतीने समस्या मांडल्या.या प्रकल्पामुळे किती तरी शेतकरी, रहिवासी भुमिहीन व बेघर होणार असुन विस्थापित होणार आहेत.या भुमिपुत्रांनी जावे तरी कुठे ? असा आर्त सवाल केला.
या बैठकीस जिल्हाधिकारी, प्रांत, तहसिलदार, आमदार हिरामन खोसकर आदिसह शेतकरी कृती समिती अध्यक्ष नागेश गायकर, अँड.अरुण पोरजे, अँड.रतन इचम, सचिव गोरख वाजे, उपाध्यक्ष विवेक कुटके उमेश खातळे,तानाजी जायभावे, उत्तम खांडबहाले अँड, प्रभाकर खराटे व शेतकरी उपस्थित होते.
