
सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित ३०९८ वा दिवस
आम्ही कधीही बंदुकीच्या वा तलवारीच्या सहाय्याने कोणत्याही विचाराचा व आदर्शाचा प्रचार व प्रसार केला नाही. अतिमंदपणे पडणाऱ्या, पडताना कुणालाही न दिसणाऱ्या, न ऐकू येणाऱ्या आणि तरीही विलक्षण परिणाम घडवून आणणाऱ्या प्रातःकालीन दवबिंदूंप्रमाणे ह्या शांत, सहिष्णु, सोशिक, धर्मनिष्ठ जातीने विचार जगतात आपला अंमल बसवला आहे. ही मोठी विलक्षण गोष्ट आहे की या जगाच्या रंगभूमीवर राष्ट्रमागून राष्ट्रे आली त्यांनी आपला अभिन्य किंचितकाळ मोठ्या जोमाने करून दाखवला आणि कालाच्या या अथांग महासागरावर प्रायः कसलेही चिन्ह वा तरंगही न उमटविता ती समूळ नष्ट झाली, पण आपण मात्र या जगात जणुकाही चिरजीवन जगत आहोत 'जे योग्यतम् आहे तेच शेवटी जिवंत राहतात चिरकाल टिकतात'.
*स्वामी विवेकानंद...*
●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●
★ भारतीय सौर २ मार्गशीर्ष शके १९४७
★ मार्गशीर्ष शुध्द /शुक्ल ३
★ शालिवाहन शके १९४७
★ शिवशक ३५१
★ विक्रम सम्वत् २०८२
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ रविवार दि. २३ नोव्हेंबर २०२५
★ १८८२ सुप्रसिध्द भारतीय उद्योगपती वालचंद हिराचंद दोशी यांचा जन्मदिन.
★ १९२६ आध्यात्मिक गुरू सत्यनारायण राजू ऊर्फ सत्य साई बाबा यांचा जन्मदिन.
★ १९३७ नोबेल पारितोषिक विजेते महान भारतीय शास्त्रज्ञ जगदिशचंद्र बोस यांचा स्मृतिदिन.
