
सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित २८५७ वा दिवस आपण आपल्या भावनांना बांध घातला नाही, तर त्यामुळे केवढा शक्तिव्यय होतो ! मन सैरभैर होते, मज्जातंतूंवर ताण पडतो आणि अल्पसेही काम हातून घडत नाही. जी शक्ती कर्मरूपाने प्रकट व्हावयाला पाहिजे ती भावनेच्या रूपाने वाहून जाते आणि त्यातून काहीही निष्पन्न होत नाही. तुम्ही जगातल्या थोर पुरुषांची चरित्रे वाचलीत तर ते स्थितप्रज्ञ होते असे तुमच्या ध्यानी येईल. कोणत्याही गोष्टीमुळे त्यांच्या मनाचा तोल कधी ढळत नसे. म्हणून जो संतापी असतो त्याच्या हातून फारसे महत्त्वपूर्ण कार्य घडत नाही. याउलट संयमी शांत, क्षमाशील, समतोल वृत्तीची माणसेच मोठमोठी कार्ये लिलया करु शकतात. *स्वामी विवेकानंद…* *●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●*
*★ भारतीय सौर ५ चैत्र शके १९४७*★ फाल्गुन वद्य /कृष्ण १२
★ शालिवाहन शके १९४६
★ शिवशक ३५१
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२६
★ बुधवार दि. २६ मार्च २०२५ ★ पापमोचनी एकादशी 🚩🚩🚩🚩🚩★ १९०९ साहित्यिक, संशोधक, दैनिक गोमंतकचे पहिले संपादक बाळकृष्ण दत्तात्रेय तथा बा. द. सातोस्कर यांचा जन्मदिन.
★ २००८ जेष्ठ दलित साहित्यिक बाबूराव रामजी बागूल यांचा स्मृतीदिन.
★ २०१२ सिध्द-हस्त कवी प्रसिद्ध गीतकार माणिकराव सिताराम गोडघाटे ऊर्फ कवी ग्रेस यांचा स्मृतीदिन.
*संकलन – प्रा. अमोल श्रीकृष्ण अहिरे, नाशिक*
