
सिन्नर ( प्रतिनिधी ) २२ नोव्हेंबर २०२५ आदिवासी विरांगणा झलकारीबाई यांच्या १९५ व्या जयंती निमीत्त महामित्र परिवार व आद्यक्रांतिकारक राघोजी ब्रिगेड यांच्या वतीने सिन्नर येथे अभिवादन करण्यात आले
या कार्यक्रमाची सुरुवात विरांगणा झलकारीबाई यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली.
आदिवासी विरांगणा झलकारीबाई यांचा जन्म २२ नोव्हेंबर १८३० साली झासी जवळील भोजला गावात एका गरीब आदिवासी कुटूंबात झाला.झलकारीबाई लहानअसतानाच तीच्या आईचा मृत्यू झाला.त्यामुळे वडिलांनी तिचे पालनपोशन केले तीला घोड्यांवर स्वार होणे,हत्यार चालविण्याचे प्रशिक्षण दिले.ती लहानपणापासुनचं शुर व धाडसी होती.एकदा ती जंगलामध्ये लाकडे गोळा करत असताना बिबट्या बरोबर झटापट झाली तीने आपल्या कु-हाडीने बिबट्याला ठार केले.तर एकदा चोरांनी गावातील एका व्यापा-यावर हल्ला केला त्यावेळी मोठ्या हिमतीने झलकारीने चोरांना पळण्यास भाग पाडले.या घटनेमुळे गावातील लोकांना तीचा अभिमान वाटला त्यांनी राणी लक्ष्मीबाईच्या सैन्यातील एका पुरन कोळी नावाच्या सैनिकाबर तीचे लग्न लावले.पुरन शुरवीर,धाडसी होता सा-या सैन्याला त्याचा अभिमान होता.

एकदा झलकारीबाई गावातील महिलांबरोबर झासीच्या किल्ल्यात गेली तेथे तीला राणी लक्ष्मीबाईने पाहिल्याबरोबर आश्चर्यचकीत झाली हुबेहुब राणी लक्ष्मीबाईसारखी दिसत होती इतर महिलांनी झलकारीबाईच्या हिमतीची,धाडसाची माहिती राणीला दिली त्यामुळे प्रभावित होऊन राणीने झलकारीबाईला दुर्गासेनेमध्ये सामिल करून सेनापती बनविले.तीला तलवार चालविणे,बंदूक चालविणे,तोफ चालविण्याचं प्रशिक्षण दिले.झासीची सेना मजबुत झाली.ब्रिटीश सरकारने लाँर्ड डलहौजीच्या नेतृत्वाखाली झासीचे राज्य हडप करायला सुरूवात केली.राज्य आपल्या नियंञणाखाली आणायचे होते राणी लक्ष्मीबाईला मुल नसल्या कारणाने उत्तराधिकारी म्हणुन दत्तक पुञ घेतले होते ते डलहौजीने नाकारले त्यामुळे राणीने ब्रिटीशांविरूध्द लढा पुकारला त्याचं नेतृत्व झलकारीबाईने केलं ब्रिटींशांशी अनेक लढाया लढल्या .१८५७ च्या उठावा वेळी ब्रिटीश सैन्याने झाशीच्या किल्ल्यावर हल्ला चढविला राणीच्या नेतृत्वाखाली घनघोर युध्द झाले.राणीच्या सेनेतील दुल्हेराव नावाच्या एका सेनानायकाने गद्दारी केली त्याने किल्ल्याचे संरक्षित दरवाजा ब्रिटीश सैन्यासाठी खोलले त्यामुळे किल्ला ब्रिटीशांच्या ताब्यात जाणार हे पाहुन झलकारीबाईने राणीला काही विश्वासु सैनिक घेऊन किल्ल्याच्या बाहेर सुरक्षित ठिकाणी नेले.व झाशीचा किल्ला ब्रिटिशांच्या ताब्यात जाऊ नये म्हणून झलकारीबाई ब्रिटिशांविरुद्ध प्राणपणाने लढली.शत्रूला शरण न जाता झलकारीबाई देशासाठी शहीद झाली.
जा कर रण में ललकारी थी,वह तो झांसी की झलकारी थी|
गोरों से लड़ना सिखा गई,है इतिहास में झलक रही,वह भारत की ही नारी थी|
भारत सरकारने तिच्या कार्याची दखल घेऊन २२जुलै २००१ रोजी झलकारीबाईच्या नावाने पोस्टाचे तिकीट सुरू केले.अशा या महान विरांगणेला विनम्र अभिवादन!
या कार्यक्रमाचे अध्यक्ष महामित्र दत्ता वायचळे, तानाजी ढोली सर, यांनी आपले मनोगत व्यक्त केले
या कार्यक्रमाचे सुञसंचलन आकाश धोंगडे यांनी केले.व प्रास्ताविक विजय मुठे केले.तर शरद जाधव आभार यांनी मानले
यावेळी महामित्र दत्ता वायचळे, राघोजी ब्रिगेडचे सहसंस्थापक विजय मुठे, मा.उपप्राचार्य महात्मा फुले तानाजी ढोली सर, आकाश धोंगडे,किरण मुठे, रोशन नागरे,सुनिल गोफने,सुनिल सावंत, रोहित मुठे,संदिप मुठे,मयुर खरौटे सोहम रायते ओम पवार , ओम नलावडे, ऋषी जगताप,सुरज खडारे,रोहित जगताप ,अजित सोनवणे, आकाश सानप,आदि.उपस्थित होते.
