
नांदगाव नगरपरिषदेतील शिवसेनेच्या सात जागा बिनविरोध**
नांदगाव : (प्रतिनिधी )नांदगावमध्ये शिवसेना आमदार सुहास कांदे यांच्या कृतिशील आणि कार्यकर्त्यांना प्राधान्य देणाऱ्या नेतृत्वाची परंपरा यंदाच्या नगरपरिषद निवडणुकीत पुन्हा एकदा अनुभवायला मिळाली. पक्षाशी अनेक वर्षे निष्ठेने जोडून राहिलेल्या व स्थानिक पातळीवर संघटन बळकट करणाऱ्या सात कार्यकर्त्यांना उमेदवारी देत त्यांना थेट बिनविरोध विजयी करण्याची कामगिरी शिवसेनेने साधली.
स्थानिक प्रश्न सोडविण्यापासून जनसामान्यांच्या अडचणी निवारणापर्यंत अखंड योगदान देणाऱ्या या कार्यकर्त्यांनी संघटन वाढविण्यात मोलाचा वाटा उचलला होता. त्यांच्या सातत्यपूर्ण मेहनतीला आमदार कांदे यांनी उमेदवारीच्या रूपाने योग्य सन्मान दिला. त्यामुळे निष्ठेला न्याय देणारा आदर्श राजकीय संदेश संपूर्ण तालुक्यात पोहोचला.
या निर्णयामुळे पक्षात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, आगामी निवडणुकीत पारदर्शकता, निष्ठा आणि कार्यतत्परता टिकवण्याचा निर्धार कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे. मतदारांनीही “निष्ठेचा सन्मान” या निर्णयाचे स्वागत करत, विकासाभिमुख निवडणुकीची अपेक्षा व्यक्त केली.

शिवसेनेचे बिनविरोध निवडून आलेले नगरसेवक
- प्रभाग क्र. २ (अ) : पांडव दीपक प्रमोद
- प्रभाग क्र. २ (ब) : नावंदर स्वाती अमोल
- प्रभाग क्र. ४ (अ) : खरोटे योगिता सचिन
- प्रभाग क्र. ४ (ब) : कासलीवाल शोभा नेमीचंद
- प्रभाग क्र. ६ (अ) : देवरे किरण जयप्रकाश
- प्रभाग क्र. ६ (ब) : कवडे वंदना चंद्रशेखर
- प्रभाग क्र. ८ (ब) : खान जुबेदाबी गफार खान
या सातही जागा बिनविरोध मिळाल्याने शिवसेनेने नगरपरिषदेच्या निवडणुकीत अर्धी विजयश्री आधीच मिळवली आहे.

नगराध्यक्षपदी सामान्य कार्यकर्त्यास संधी
नांदगाव पालिकेच्या नगराध्यक्षपदासाठी सागर हिरे या साध्या पण कर्तव्यशील कार्यकर्त्याला उमेदवारी देत पक्षाने पुन्हा एकदा “कार्यकर्ताच पक्षाची ताकद” हा संदेश अधोरेखित केला.
