
नासिक रोड-(प्रतिनिधी ) ब्राह्मण सभा नाशिक रोड दरवर्षी वधु वर मेळावा व सामुदायिक मौजी कार्यक्रमचे आयोजन करत असते. दहावी बारावीच्या परीक्षा झाल्यानंतर मार्च महिन्यात वधू-वर मेळाव्याचे आयोजन करण्यासाठी डिसेंबर पासून तयारीला सुरुवात करण्यात येते. विहित फॉर्म माहितीपत्रक हे महाराष्ट्रातील विविध जिल्हा गावांना पाठवण्यात येते. नाशिक मधील विविध महत्त्वाच्या ठिकाणी गटप्रमुख नेमण्यात येऊन तेथील वधू वर यांची माहिती संकलित करण्यात येते. श्री सुरेश कुलकर्णी वधू वर मेळावा समिती प्रमुख असल्याने ते यासाठी विशेष मेहनत घेत असतात.

यावर्षीचा वधू-वर मेळावा मागील रविवारी ब्राह्मण सभा सभागृह, राजीव गांधी शाळेच्या मागे, दसक, जेल रोड नाशिक रोड येथे संपन्न झाला. मेळाव्यात ५६ मुले व १६ मुलींनी नोंदणी केली होती. मेळाव्याचे उद्घाटन श्री अनिल दंडे, गोविंद दंडे अँड सन्स, विश्वस्त के.पी. कुलकर्णी, सुरेश कुलकर्णी, सुनील मेंढेकर, उदय धर्माधिकारी, दत्ता कुलकर्णी व वधू-वरांमधून तीन मुले व एक मुली च्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. प्रास्ताविकात दत्ता कुलकर्णी, सचिव, यांनी ब्राह्मण सभा नाशिक रोड इमारतीची उभारणी, उभारणीचे उद्दिष्ट, वर्षभरात होणारे विविध कार्यक्रम, उपक्रम तसेच विद्यार्थी गुणगौरव कार्यक्रमाची सविस्तर माहिती दिली येत्या सिंहस्थापूर्वी इमारतीचे बांधकाम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट असल्याने दानशूर व्यक्तींनी सढळ हाताने इमारत निधीस मदत करावी असे आवाहन त्यांनी केले. श्री अनिल दंडे यांचा शाल श्रीफळ देऊन श्री के पी कुलकर्णी, विश्वस्त यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. श्री दंडे यांनी लग्न या ऋणानुबंधाच्या गाठी आहेत व भगवंताच्या कृपेने त्या बांधण्यात येतात. तथापि दोन्हीकडच्या नातलग मंडळींनी विवाह व्यवस्थित पार पाडावा व विवाह नंतरचे संबंध देखील अत्यंत आपुलकीचे ठेवावेत असे आवाहन केले. यासाठी त्यांनी सत्य घटनेवर आधारित एक कथा विशद केली गोविंद दंडे अँड सन्स या दुकानात फक्त सोन्या-चांदीचे बस्तेच होत नाहीत तर दोन्ही पक्षातील लोकांना योग्य ते सहकार्य करून विवाह यशस्वी करण्यासाठी मार्गदर्शन केले जाते. ब्राह्मण सभा नाशिक रोडचे कार्य अत्यंत उत्कृष्ट रितीने सुरू असून विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने समाजातील सर्व स्तरातील व्यक्तींचा सहभाग या ठिकाणी दिसून येतो. भाषणाच्या शेवटी त्यांनी वधू वर मेळावा तसेच सामुदायिक मौजी कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या.श्री अनिल दंडे यांच्या हस्ते सौ वसुंधरा सांबरे कुलकर्णी यांचा गुण मिलन करण्याची सेवा देण्याबद्दल व सौ मयुरी बाहीकर, यांचा मंदाकिनी शेरीकर यांच्या हस्ते शाल, पुष्प देऊन सत्कार करण्यात आला.

फॉर्म देणे नोंदणी फी येऊन पावती देणे कामी श्री उदय धर्माधिकारी, मुग्धा कुलकर्णी , श्री मकरंद एकतारे व श्री अविनाश गोसावी तसेच वर वधू फॉर्म वाचन अनघा जोशी, सुलभा देशपांडे, सौ.मंजुषा ताथोडे, सौ मेखला रासवलकर, मंदाकिनी शेरीकर यांनी काम पाहिले. चहा नाश्ता जेवण याची पूर्ण जबाबदारी श्री किरण हिंगणे व श्री मिलिंद ताथोडे यांनी सांभाळली. मेळाव्यात मुले व मुलींना मंचावर बोलवण्यात येऊन ते आपली सर्व माहिती सांगत होते. मेळाव्यात मुलींच्या संख्येच्या तुलनेत मुलांची संख्या अधिक होती. मेळावा दोन सत्रात संपन्न झाला. पहिले सत्र दुपारी १ वाजता संपले व त्यानंतर सर्व उपस्थितानी सुरुची भोजनाचा आस्वाद घेतला. दुसरे सत्र २ वा. सुरू झाले. त्यात विनीत कुलकर्णी व अन्य वरवधूपित्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. मेळाव्याच्या समारोप भाषणात श्री उदय धर्माधिकारी यांनी विवाह संस्था बळकट करण्यासाठी वधू वर मेळाव्याची आवश्यकता असते व त्यामध्ये बरेचसे विवाह जुळतात. ब्राह्मण सभा नासिक रोड असे उपक्रम नेहमी साजरे करत असते व त्यास सर्वांचा प्रचंड प्रतिसाद मिळतो. प्रतिसाद भविष्यात देखील द्यावा असे आवाहान त्यांनी केले.श्री राजीव व्यवहारे, खजिनदार यांनी आदल्याच दिवशी छोटा अपघात झाल्या नंतरही मेळाव्यास उपस्थिती दिली व सर्वांचे आभार मानले.वरवधू सूची चे डीटीपी काम श्री मकरंद एकतारे यांनी अत्यंत कुशलतेने करून मेळाव्या समापनात संबंधीतांना वर वधू सूचीचे श्री जयंत पारळकर, श्री शिरीष जोशी, सुरेश कुलकर्णी यांच्या मदतीने वितरण केले. वधू वर मेळावा यशस्वी करण्यासाठी दत्ता कुलकर्णी, सुनील मेंढेंकर, सारंग धरणगावकर, अविनाश गोसावी, राजीव व्यवहारे, शोभना व्यवहारे, मंजुषा ताथोडे, दिलीप भिंगारकर, दिपाली भिंगारकर व नासिक यजुर्वेदी शाखा व ऋग्वेदी संस्था नासिक यांनी विशेष सहकार्य केलेसदर मेळाव्यास श्री मुकुंद कुलकर्णी अध्यक्ष ब्राह्मण सभा नाशिक रोड यांचे नियोजनासाठी मार्गदर्शन लाभले. ब्राह्मण सभा नाशिक रोड तर्फे सामुदायिक मौंजी कार्यक्रम १४/५/२५ बुधवार रोजी आयोजित करण्यात आला आहे. नाव नोंदणीसाठी श्री सुरेश कुलकर्णी यांना मोबाईल क्रमांक ९८९०५ ७६५२८ वर संपर्क साधावा वृत्त संपर्क- दत्ता कुलकर्णी सचिव ब्राह्मण सभा नाशिक रोड ९९२२४४४२२१

