
नांदगाव( प्रतिनिधी) दिनांक १५।११।२५ शाळेत आदिवासी जननायक भगवान बिरसा मुंडा यांची १५० वी जयंती साजरी करण्यात आली .
या कार्यक्रमाच्या निमित्ताने नांदगांव रेल्वे स्टेशन सेक्शन इंजिनीयर श्री डि के .सिंग सहाय्यक इंजिनियर श्री जितेंद्र भोसले पत्रकार संदिप जेजूर कर पालक सदस्य तुषार पांडे मुख्याध्यापक श्री ल.ना. ठाकरे उप मुख्याध्यापक श्री नांदूरकर टी एम सदस्य भास्कर मधे सर टी .एम . सदस्य झोडगेकर मॅडम उपस्थित होते . मान्यवरांच्या हस्ते भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुण अभिवादन करण्यात आले .

कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक श्री . ठाकरे सर यांनी केले आपल्या प्रास्तविकात सरांनी भगवान बिरसा मुंडा यांचे स्वातंत्र्य युद्धातील योगदान आदिवासीच्या हक्का साठी ब्रिटीशा विरुध्द दिलेला लढा व जयंती साजरी करण्या मागील उद्येश यांची माहिती दिली

या निमित्ताने इ ५वी क व इ .६ वी अ विद्यार्थ्यांनी आदिवासी संस्कृती सांगणारे सुंदर असे आदिवासी नृत्य सादर केले . या विद्यार्थीनींना श्रीमती बाकळे मॅडम श्रीमती निवेदिता सांगळे मॅडम यांनी मार्गदर्शन केले . कार्यक्रमा निमित्त
शाळेतील जेष्ठ शिक्षक श्री संदेश नरसकर सर यांनी आपल्या भाषणात भगवान बिरसा मुंडा यांचे बालपण शिक्षण जीवनातील प्रसंग ब्रिटीशाच्या विरुद्ध जल जमीन आकाश यांच्या दिलेला लढा भोगलेला तुरंगवास यांच्या बाबत सवित्तर माहिती दिली

व बिरसा मुंडा यांचा जीवन परिचय करून दिला
प्रमुख पाहुणे श्री डि.के . सिंग यांनी बिरसा मुंडा ज्या ठिकाणी बालपण गेले त्या भौगोलिक ठिकाणाची माहिती आपल्या भाषण दिली श्री .ङि के .सिंग यांनी दिलेल्या वह्या व पेन यांचे वाटप शाळेतील गरीब व होतकरू विद्यार्थाना करण्यात आले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार श्री कुणाल जोशी यांनी मानले
