
ओझर: दि.७ वार्ताहर
टीडीके कंपनी, मविप्र माजी विद्यार्थी संघटना, व बोरस्ते विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने दोन दिवसीय विज्ञान कार्यशाळेचे उद्घाटन ओझर येथील माधवराव बोरस्ते विद्यालयात मविप्र संस्थेचे शिक्षणाधिकारी प्रा डॉ भास्करराव ढोके यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षीय भाषणात बोलताना प्रा डॉ ढोके यांनी उद्घाटन प्रसंगी विज्ञान साहित्याचा वापर सर्व विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचला पाहिजे असे आवाहन शिक्षकांना केले.

याप्रसंगी नुतन इमारत बांधकाम व ग्रंथालयाची पाहणी डॉ ढोके यांनी केली. कार्यक्रमाचे प्रशिक्षक संजीवकुमार पाटील कर्नाटक सर्व विज्ञान शिक्षकांना दोन दिवस प्रशिक्षित करणार आहे. या कार्यशाळेसाठी प्रशांत निकाळे माजी विद्यार्थी संघटना समन्वयक यांनी प्रयत्न केले. व्यासपीठावर शालेय समितीचे अध्यक्ष भास्करराव शिंदे, मुख्याध्यापक सोपान वाटपाडे उपमुख्याध्यापक सतीश केदार पर्यवेक्षक दशरथ शिंदे व परिसरातील तेरा विद्यालयातून दिडशे पेक्षा जास्त विज्ञान शिक्षक उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व विज्ञान शिक्षकांनी परिश्रम घेतले.

सूत्रसंचालन शिक्षिका शितल हांडोरे, शीतल आहेर यांनी केले. फलकलेखन सविता पवार मोनाली निकम वर्षा पाटील मोहन क्षीरसागर यांनी केले. आभार उपमुख्याध्यापक सतीश केदार यांनी मानले.
