
नांदगाव (प्रतिनिधी ) , नांदगाव येथील जे. टी. कासलीवाल इंग्लिश मिडियमचे प्राचार्य श्री. मनी चावला यांना नुकताच बेस्ट प्रिन्सिपल अवॉर्ड मिळाला आहे. इंडियन टॅलेंट ओलम्पियाड मार्फत घेण्यात आलेल्या सर्वे मध्ये भारतातील CBSE शाळांपैकी सर्वोत्तम कासलीवाल स्कूलचे प्राचार्य श्री. मनी चावला यांची बेस्ट प्रिन्सिपल म्हणून निवड झाली आहे. इंडियन टॅलेंट ऑलिंपियाड यांच्याकडून आयपीएस किरण बेदी व ऑलिम्पिक पदक जिंकणारी पहिली भारतीय बॅडमिंटनपटू साहिना नेहवाल यांच्या हस्ते सर्वोत्कृष्ट प्राचार्य पुरस्कार मिळाल्याबद्दल शाळेचे आदरणीय प्राचार्य श्री. मणी चावला यांचे यावेळी मनापासून अभिनंदन करण्यात आले. तसेच यापूर्वीही सरांना धुळे येथील अवधूत इंटरप्राईजेस यांच्या विद्यमाने देण्यात येणारा आदर्श सर्वोत्तम व्यवस्थापक, मुख्याध्यापक पुरस्कार मिळाला आहे. सरांचे प्रचंड समर्पण आणि शैक्षणिक क्षेत्रातील मौल्यवान योगदानामुळे सरांचे शिक्षक,विद्यार्थी, पालकांकडून कौतुक होत आहे. या सन्मानामुळे JTKEMS आणि संपूर्ण नांदगाव शहराला प्रचंड अभिमान आणि आनंद मिळाला. प्राचार्यांच्या दूरदर्शी मार्गदर्शनाखाली, शाळेने शैक्षणिक, शिस्त आणि समग्र विकासात नवीन उंची गाठली आहे. विद्यार्थी आणि शिक्षकांना प्रेरणा देण्याच्या क्षमतेमुळे शिक्षण, सचोटी आणि यशाची संस्कृती निर्माण झाली आहे.ही प्रतिष्ठित मान्यता केवळ एक वैयक्तिक मैलाचा दगड नाही तर जेटीके स्कूल कुटुंबातील आणि नांदगाव समुदायातील प्रत्येक सदस्यासाठी अभिमानाचा क्षण आहे. हे अथक प्रयत्न, शिक्षणाची आवड आणि उत्कृष्टतेच्या शोधाचे प्रतीक आहे.या यशाबद्दल संस्थेचे चेअरमन मा. सुनीलभाऊ कासलीवाल, संस्थेचे सचिव विजय चोपडा, सहसचिव प्रमिलाताई कासलीवाल, सुशीलभाऊ कासलीवाल, महेंद्रभाऊ चांदिवाल, जुगलकिशोर अग्रवाल,रिखबचंद कासलीवाल,प्रशासक पी पी गुप्ता यांनी श्री. मणी चावला यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. तसेच सौ.क.मा.कासलीवाल प्राथमिक व माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. विशाल सावंत,गोरख डफाळ दोन्ही माध्यमांचे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, पालक यांनी सरांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
