

सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित ३०७८ वा दिवस
लहानपणापासूनच करुणात्मक, बलदायक, विधायक, रचनात्मक असे उपयुक्त विचार त्यांच्या मेंदूत शिरू द्या. असल्याच विचारांचा प्रभाव स्वतःवरही पडू द्या. दुबळेपणा आणतील, पंगू बनवतील अशा विचारांना थारासुद्धा देऊ नका. दृढपणे सदा आपल्याशी म्हणा - "मी तोच आहे, मी तोच आहे - मी आत्मा आहे." तुमच्या हृदयात हेच एखाद्या संगीतासारखे अहर्निश झंकृत होत राहो. अगदी मृत्यूसमयी देखील 'सोऽहं' 'सोऽहं' असा घोष करीतच प्रयाण करा. हेच सत्य आहे की हे जग चालविणारी महाशक्ती तुमच्या ठायी आहे.
*स्वामी विवेकानंद...*
●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●
★ भारतीय सौर १२ कार्तिक (उर्जमास) शके १९४७
★ कार्तिक शुक्ल /शुध्द १३
★ शालिवाहन शके १९४७
★ शिवशक ३५१
★ विक्रम सम्वत् २०८२
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ सोमवार दि. ३ नोव्हेंबर २०२५
★ गोरक्षनाथ जयंती
★ १८१९ प्रसिध्द शाहीर, ‘फटका’ कार, गोंधळी, कवी अनंत भवानीबाबा घोलप ऊर्फ अनंत फंदी यांचा स्मृतिदिन
★ १८३८ ‘द टाइम्स ऑफ इंडिया’ हे जगातील सर्वाधिक खपाचे इंग्लिश दैनिक ‘द बॉम्बे टाइम्स अँड जर्नल ऑफ कॉमर्स’ या नावाने मुंबईत सुरू झाले.
★ १९३३ कल्याणाभिमुख अर्थशास्त्र व सामाजिक पर्याय सिद्धान्त या विषयांतील कार्यासाठी नोबेल पारितोषिक विजेते अमर्त्य सेन यांचा जन्मदिन.
