
सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित ३०६१ वा दिवस
समग्र मानव जातीचे अध्यात्मिकीकरण हाच आहे भारताच्या जीवनकार्याचा मूलमंत्र, हेच आहे भारताच्या शाश्वत गीतांचे ध्रुवपद, त्याच्या अस्तित्वाचा कणा. हाच आहे भारतीयतेचा मुलाधार, हेच आहे भारताच्या जीवनाचे मूल प्रयोजन. या त्याच्या जीवनमार्गापासून तो कधी विचलित झाला नाही मग राज्य सुलतानाचे असो, तुर्कांचे असो, मोगलांचे असो अथवा इंग्रजांचे असो. दर्शन, धर्म व नीतिशास्त्र म्हणा की मधुरता, कोमलता व मानव जातीविषयी निष्कपट प्रेम वगैरे सद्.गुण म्हणा आमची ही मातृभूमी ही भारतभूमीच त्या साऱ्यांचे जन्मस्थान आहे अजूनही भारत या सर्व बाबतीत जगातील कोणत्याही देशापेक्षा वरचढ आहे.
*स्वामी विवेकानंद...*
●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●
★ भारतीय सौर २५ अश्विन (इषमास) शके १९४७
★ अश्विन कृष्ण/वद्य ११
★ शालिवाहन शके १९४७
★ शिवशक ३५१
★ विक्रम सम्वत् २०८२
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ शुक्रवार दि. १७ ऑक्टोबर २०२५
★ रमा एकादशी 🚩🚩🚩🚩🚩🚩
★ गोवत्स द्वादशी ‘वसुबारस’
★ १८६९ भारत गायन समाज या संस्थेचे संस्थापक, गायनाचार्य पंडित भास्करबुवा बखले यांचा जन्मदिन
★ १८८२ संस्कृत, इंग्रजी व्याकरणकार, ग्रंथकार, समाजसुधारक, लघुलेखक दादाबो पांडूरंग तर्खडकर यांचा स्मृतिदिन.
★ १८९२ कृषी शिरोमणी, पहिले मराठी साखर कारखानदार नारायणराव सोपानराव बोरावके यांचा जन्मदिन
★ १९१७ सहकार क्षेत्रातील अग्रणी व्यक्तिमत्व, वारणा सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक विश्वनाथ आण्णा तथा तात्यासाहेब कोरे यांचा जन्मदिन
★ १९५५ सुप्रसिध्द हिंदी चित्रपट अभिनेत्री, खांदेशकन्या पद्मश्री स्मिता पाटील यांचा जन्मदिन.
★ जागतिक गरिबी निर्मूलन दिन.
संकलन – प्रा. अमोल श्रीकृष्ण अहिरे, नाशिक
