
*ईगतपुरी( तालुका प्रतिनिधी- नवनाथ गायकर यांजकडुन) आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाचे जातनिहाय प्रवर्ग आरक्षण काढणेबाबत चक्राकार पद्धत किंवा आळीपाळीने काढावे असे न्यायालयाने म्हटले आहे.याबाबतचा चेंडु आता राज्य सरकारच्या कोर्टात टाकला आहे.लवकरच हे आरक्षण जाहिर होत असुन निवडणुकाच्यां संभाव्य हालचाली गतीमान झाल्या आहेत. या पाश्वर्भुमी वर इच्छुकाचीं धडधड वाढली असुन, नाना तर्क वितर्क अंदाज वर्तवले जात आहे. न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार निर्णय अंमलबजावणी झाल्यास ईगतपुरी त्रंयबकेश्वर मतदारसंघातील जि.प.गट व गणाचें मागील आरक्षण बदलणार आहे. ईगतपुरी तालुक्यापुरते गटाचा विचार केला तर चक्राकार पद्धतीने आरक्षण बदलल्यास अनेक राजकिय समिकरणे बदलणार आहेत.प्रस्थापितानां गट शोधावे लागतील तर काहिनां बढती वा लढतीची संधी मिळेल अशी आशा आहे.माजी जि.प.सदस्याचीं ही धाकधुक वाढली अनेक इच्छुकाचांही जीव टांगणीला लागलेला आहे. दिवाळी आटोपल्यानंतर कधीही या निवडणुकाचीं रणधुमाळी सुरु होणार आहे. यामुळे आता सगळयाचेंच लक्ष आरक्षण कसे पडते याकडे लागले आहे.
