
प्रांताधिकारी, डी वाय एस पी ,तहसीलदार पोलीस निरीक्षक मुख्याधिकारी यांच्यासह सर्व धर्मीय धर्मगुरूंच्या प्रमुख उपस्थितीत झाला कार्यक्रम…

हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतीक म्हणून करण्यात येतो कार्यक्रम
गेल्या 19 वर्षांपासून सुरू आहे परंपरा.–

मनमाड (प्रतिनिधी)सध्या देशात हिंदु मुस्लिम या दोन समाजात मोठया प्रमाणावर वाद निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू असुन हा प्रयत्न हाणून पाडण्यासाठी मनमाड शहरातील फुले शाहु आंबेडकर मुस्लिम विचारमंचतर्फे रोजा इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते येथील उस्मानिया चौक येथे हा एकतेचा कार्यक्रम संपन्न झाला बाबा रणजित सिंग, मौलाना उस्मान,बौद्ध भिक्षु दिपमकर यांच्यासह सर्व धर्मीय धर्मगुरू तसेच प्रांतअधिकारी बाबासाहेब गाढवे,उपविभागीय पोलीस अधीक्षक बाजीराव महाजन,तहसीलदार सुनील सौदाने,पोलीस निरीक्षक विजय करे महावितरणचे तळेले साहेब मुख्याधिकारी शेषराव चौधरी यांच्यासह शिवकन्या संगिता सोनवणे, आम्रपाली निकम वैशाली पगारे,सतीश केदारे,गुरुकुमार निकाळे आदींनी आपल्या भाषणातूंन आपले मत व्यक्त केले

व देशाला सध्या एकतेची गरज असुन नागरिकांनी देखील दोन समाजात तेढ निर्माण होईल असे काम करू नये असे मतं व्यक्त केले.यावेळी अध्यक्ष मिरझा अहमद बेग कार्याध्यक्ष फिरोज शेख यांनी पाहुण्यांचे स्वागत केले.
–आमिन शेख, मनमाड

