
सिन्नर (वार्ताहर सोमनाथ गिरी ):- डुबेरे येथील जनता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात मराठा विद्या प्रसारक संस्थेचे भूतपूर्व सरचिटणीस कर्मवीर डॉ. वसंतराव पवार यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यात आले. अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक रंगनाथ उगले होते.व्यासपीठावर पर्यवेक्षिका जयश्री पगारे,पोलीस पाटील रामदास वारुंगसे,कचेश्वर शिंदे,विद्या ठाकरे,रेखा खंडीझोड आदी उपस्थित होते. उपस्थितांच्या हस्ते डॉ.पवार यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. उपशिक्षक सोमनाथ गिरी यांनी डॉ. पवार यांच्या जीवन व कार्याचा आढावा घेतला. यावेळी बोलताना कार्यक्रमाचे अध्यक्ष रंगनाथ उगले म्हणाले की,डॉ. पवार यांनी शिस्त ,गुणवत्ता व पारदर्शकता या त्रिसूत्रीवर मविप्र संस्थेचा कारभार केला. संस्थेच्या संख्यात्मक व गुणात्मक विस्तारासाठी त्यांनी अविरत प्रयत्न केले. डॉ. पवार यांचे सामाजिक,सहकार,राजकीय,शैक्षणिक,वैद्यकीय साहित्य आदिंसह विविध क्षेत्रातील कार्य उल्लेखनीय आहे. सूत्रसंचालन शालेय सांस्कृतिक समितीचे प्रमुख सुनिल ससाणे यांनी तर आभार डी. ए.रबडे यांनी मानले.यावेळी रेवणनाथ कांगणे,सीमा गोसावी,वरिष्ठ लिपिक राणी शिंदे ,सरिता कुटे,रवि गोजरे, किशोर शिंदे,ज्ञानेश्वर कडभाने शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
