
. नाशिक (प्रतिनिधी,)….महाराष्ट्र राज्य क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय पुणे आयोजित राज्यस्तरीय हॉकी स्पर्धा 25 ते 27 दरम्यान पुणे बालेवाडी येथे संपन्न झाल्या नाशिक विभागाचे नेतृत्वअजिज सय्यद यांच्या. मार्गदर्शनाखाली तयार झालेला के एन केला हायस्कूल यांनी केले नाशिक चा पहिला सामना छत्रपती संभाजीनगर यांच्या दरम्यान झाला एक झिरो ने हा सामना नाशिकने जिंकला दुसरा सामना बलाढ्य असा नांदेड चा संघ जो लातूर विभागाचे प्रतिनिधित्व करीत आहे यांच्या दरम्यान झाला

अतितटी च्या सामन्यात सामना हा बरोबरीत सुटला पेनल्टी शूट आउट मध्ये नाशिक विभागाने लातूर विभागाला चार विरुद्ध तीन या गोल फरकाने विजय संपादन करून फायनल मध्ये प्रवेश केला लातूर संघावर हितेश झोपे सुबोध जाधव अथर्व कंटाळे यश थोरात यांनी गोल केले रेहान मंजुरी याने उत्कृष्ट गोलकीपरचे प्रदर्शन केले अंतिम सामना होम ग्राउंड असलेले क्रीडा प्रबोधिनी बरोबर झाला दोन शून्याच्या फरकाने नाशिक हा सामना गमावला व राज्यस्तरीय स्पर्धेत उपविजेते पदाचा मान पटकावला
