
भालूर (वार्ताहर) जाता जाता परतीच्या पावसाने वादळी वाऱ्यासह हजेरी लावत भालूर सह लोहशिंगवे, सोयगाव, वडाळी, लक्ष्मीनगर, मांडवड मोहेगाव आदी परिसरात मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावत सर्व पिके होत्याचे नव्हते झाली. शनिवारी पाच वाजता सुरू झालेला पाऊस रात्रभर टप्प्याटप्प्याने सुरूच राहिला.रविवारी सकाळी नऊ वाजेपर्यंत मुसळधार पाऊस झाल्याने पावसाबरोबर वादळी वाऱ्यामुळे उभे असलेली पिके भुईसपाट झाली

आणि शेतकऱ्यांच्या हातात आलेली पिके डोळ्यासमोर वाहून जाताना पाहण्याची वेळ आली. यावर्षी मे महिन्याच्या मध्यावर आलेल्या पावसाने पिके जोमात आलेली होते. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हातात दोन पैसे येतील असे वाटत असताना काल झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या स्वप्नांचा चक्काचूर झाले. वादळी वारा आणि पाऊस यामुळे परिसरातील मका,कांदा,बाजरी,भुईमूग,कांदा रोपे, टोमॅटो आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.अजूनही पावसाचा अंदाज वर्तवला जात असल्याने शेतकरी वर्गात भीतीचे वातावरण पसरले आहे. तत्काळ भरपाई ची गरजकाल झालेल्या पावसामुळे झालेले नुकसान भरून येणार नसले तरी शेतकऱ्यांना आता आधाराची गरज असून प्रशासनाने लवकरात लवकर पंचनामे करून तत्काळ भरपाई देण्याची मागणी शेतकरी वर्गाकडून केली जात आहे.

प्रशासनाने तत्काळ पंचनामे करून लवकरात लवकर शेतकऱ्यांना मदत मिळणे गरजेचे आहे.कारण दोन पैसे मिळणार त्यातच पावसाने हाहाकार केल्याने आता पुन्हा उभे राहण्यासाठी शेतकऱ्यांना आधाराची गरज आहे.समाधान थेटे शेतकरी भालूर
