
*सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित २८४९ वा दिवस* अत्यंत शांततेत आणि मौनात ज्यांची प्रचंड कार्यशक्ती गतिमान असते आणि भोवती प्रचंड कर्म-कोलाहल सुरू असतानाही ज्याच्या अंतर्यामी निगूढ शांती आणि स्थिरता यांचे वास्तव्य असते तो मनुष्य आदर्श समजावा. तो स्वतःचा स्वामी आहे. त्याला संयमाचे रहस्य कळलेले आहे. मोठ्या रस्त्यांवरच्या गजबजलेल्या वाहतुकीतून तो चाललेला असला तरी निःशब्द गुहेत ध्यानस्थ बसल्यासारखे त्याचे मन स्थिर असते. तरीही तो सर्वकाळ अत्यंत कार्यमग्न असतो. हाच कर्मयोगाचा आदर्श आहे. तो जर तुम्हाला आकळला तर कार्याचे रहस्य तुम्हाला उलगडल्यासारखे आहे. *स्वामी विवेकानंद…* *●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●*
*★ भारतीय सौर २७ फाल्गुन शके १९४६*★ फाल्गुन वद्य /कृष्ण ४
★ शालिवाहन शके १९४६
★ शिवशक ३५१
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२६
★ मंगळवार दि. १८ मार्च २०२५ ★ १५९४ हिंदवी स्वराज्याचे प्रणेते शहाजीराजे भोसले यांचा जन्मदिन
★ १८५८ डिझेल इंजिनचा शोध लावणारे संशोधक रुडॉल्फ डिझेल यांचा जन्मदिन
★ १८८१ स्वातंत्र्यसैनिक, पत्रकार, राष्ट्रमत आणि स्वतंत्र हिन्दुस्तानचे संपादक वामन गोपाळ तथा वीर वामनराव जोशी यांचा जन्मदिन.

