
नांदगाव तालुका स्तरिय विज्ञान नाट्य महोत्सव २०२५ अंतर्गत व्ही. जे. हायस्कूल, नांदगाव येथील विज्ञान नाटिका “डिजीटल इंडिया जीवन सक्षमीकरण” या नाटिकेस द्वितीय क्रमांक प्राप्त झाला. ही नाटिका कु. गिरीजा वाघमारे (इ.९ वी-अ) यांनी लिहिली असून मृणाल दंडगव्हाळ, वेदिका पाटील, संकेत थोरे, सोहम कुलये, साई जाधव व रुद्र इप्पर यांनी उत्तम अभिनय सादर केला. या नाटिकेस श्री. प्राविण आहिरे, श्रीमती दिपाली सांगळे तसेच सर्व विज्ञान शिक्षकांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.शालेय समिती अध्यक्ष श्री. संजीव धामणे, मुख्याध्यापक श्री. लक्ष्मिकांत ठाकरे व उपमुख्याध्यापक डॉ. जोगेश्वर नांदुरकर आदी मान्यवरांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करून अभिनंदन केले. या यशामुळे शाळेचा गौरव वाढला असून विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाबद्दलची आवड अधिक बळकट झाली आहे !
