
ओझर: ( वार्ताहर )माधवराव बोरस्ते विद्यालयात संस्कृत दिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक सोपान वाटपाडे यांच्याहस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. विद्यालयाचे उपमुख्याध्यापक सतीश केदार पर्यवेक्षक दशरथ शिंदे उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापक सोपान वाटपाडे यांनी आपल्या मनोगतात संस्कृत भाषेचा अभ्यास करणे आजच्या काळाची गरज आहे असे प्रतिपादन करीत संस्कृत भाषेचे महत्त्व स्पष्ट केले. याप्रसंगी विद्यालयातील नववी ड च्या विद्यार्थिनी कु भक्ती शिवने, श्रावणी सोनवणे यांनी श्लोक पठण व त्यांचा अर्थ सांगितला. सूत्रसंचालन कु नयन मोरे हिने केले तर आभार कार्तिकी वाकचौरे हिने मानले. याप्रसंगी विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षक शिक्षिका मंगल सावंत संगीता शेटे रेखा देशमाने आत्माराम शिंदे शितल हांडोरे महेंद्र डांगले नरेंद्र डेरले तसेच सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते.
