
नाशिक ( प्रतिनिधी ) स्वामी विवेकानंद सोसायटी संचलित श्रीमान टी.जे.चौहान माध्यमिक विद्यालय मोरवाडी येथे क्रांती दिनानिमित्त इयत्ता पाचवी ते आठवी या वर्गांची समरगीत स्पर्धा आयोजित करण्यात आली होती . संगीतविशारद मा . सुरभी गौड यांनी स्पर्धेचे परीक्षण केले . विविध वेशभूषेत विद्यार्थ्यांनी गीत सादर करून देशभक्तिमय वातावरण निर्माण केले. स्पर्धेत पुढील इयत्ता प्रथम क्रमांकाच्या मानकरी ठरल्या.1. पाचवी अ2. सहावी अ3. सातवी ब4. आठवी बया वर्गांचा फिरत्या ढाली देऊन गौरव करण्यात आला. विद्यालयच्या मुख्याध्यापिका उज्वला माळी यांनी प्रमुख पाहुण्यांचे आभार मानले.यशवंत गावित यांनी क्रांती दिनाची माहिती सांगितली. पाहुण्यांचा परिचय कु. धनश्री सोनवने हिने तर संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. शर्वरी शिरसाठ हिने केले. याप्रसंगी मुख्याध्यापिका सौ .उज्वला माळी ,पर्यवेक्षक श्री .कीर्तिकुमार गहाणकारी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वृंद उपस्थित होते .
