

सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित २९९४ वा दिवस

प्रत्येक देशाला अनुरूप अशा नव्या सामाजिक व्यवस्था घडल्याशिवाय जुन्या व्यवस्था फेकून देणे हे हिताचे नाही. प्रगती, विकास, बदल हे सावकाशपणे होतात. देशातील माणूस बदलला, की देश आणि तेथील सामाजिक व्यवस्था बदलणे अपरिहार्य होते. अशी यंत्रणा निर्माण करा की, जी व्यक्तीसापेक्ष नाही. अमूक आला किंवा तमूक एक गेला यामुळे ती यंत्रणा कोसळता कामा नये. आपण भारतीय स्थिर संघटना निर्माण करू शकत नाही याचे कारण आपल्या अधिकारात कोणी वाटेकरी आलेला आपल्याला खपतच नाही आणि आपण गेल्यानंतर या यंत्रणेचे काय व्हायचे, ती कोण, कशी चालवणार याचा आपण कधी विचारच करत नाही.
*स्वामी विवेकानंद...*
●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●
★ भारतीय सौर २० श्रावण (नभमास) शके १९४७
★ श्रावण कृष्ण /वद्य २
★ शालिवाहन शके १९४७
★ शिवशक ३५१
★ विक्रम सम्वत् २०८२
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ सोमवार दि. ११ ऑगस्ट २०२५
★ तृतीय श्रावण सोमवार, शिवमुठ – मुग
★ १९०८ क्रांतीकार खुदीराम बोस यांचा स्मृतीदिन
★ १९४३ “रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे” पहिले भारतीय गव्हर्नर म्हणून सी. डी. देशमुख यांची नियुक्ती झाली.
★ १९७० साहित्य अकादमी व महाराष्ट्र शासन पुरस्कार विजेत्या मानववंशशास्त्रज्ञ, समाजशास्त्रज्ञ, शिक्षणतज्ञ इरावती कर्वे यांचा स्मृतिदिन.
