
सिन्नर (प्रतिनिधी)फुलन देवी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आलीवयाच्या ११ व्या वर्षीच फुलनचं लग्न तिच्या वडिलांच्या वयाच्या इसमासोबत झालं तिच्या नवऱ्याचं नाव पुट्टीलाल त्यानं वयात येण्याच्या अगोदरच तिला आपल्या सोबत नेलं. तिचा मानसिक, शारिरीक छळ केला.

तो तिला नेहमी मारहाण करत असे. त्याच्या त्रासामुळे फुलन दोन-तीन वेळा घरातून पळालीसुद्धा. पण तिला समजावुन पुन्हा त्या नराधमाच्या हवाली केलं गेलं. पण नंतर तिचा नवरा तिला एका बोटीवर सोडून पळून गेला. नंतर त्यानं तिकडे दुसरं लग्न केलं. फुलन तिच्या गावी परत आली आणि पुन्हा पहिल्यासारखी कामं करू लागली. पण आता गावकरी तिचा छळ करू लागले. ‘नवरा सोडून आलेली म्हणून तिला हिनवू लागले. तिला गावातून हाकलून लावा असं म्हणू लागले. कारण नवरा नसलेली बाई गावात राहणं ही त्यांच्या दृष्टीनं चांगली गोष्ट नव्हती. गावातील सरपंच, पाटील आणि तिचा चुलत भाऊ (मायादीन) तिला धमकावू लागले.फुलनवर वयाच्या १५ व्या वर्षी तिच्यावर बलात्कार झाला, तोसुद्धा तिच्या आई-वडिलांसमोर. बलात्कार करणारा सरपंचाचा मुलगाच होता. फुलन त्याला काही उलटसुलट बोलली होती. फुलननं पोलिसांकडे मदत मागितली, पण पोलिसांनी तिला काही मदत केली नाही. काही दिवसांनंतर फुलन तीच्या बहिणीच्या गावी गेली. तेव्हा इकडे सरपंच आणि तिचा चुलत भाऊ तिच्यावर डाकू असण्याचा खोटा आरोप लावून आणि फुलन व तिच्या आई-वडिलांना खूप मारहाण करतात आणि फुलनला गावातून हाकलून देतात आणि बाबू गुज्जर याची नजर फुलन देवीवर पडतो आणि तीला आपल्यासोबत घेऊन जातात. बाबू गुज्जरसुद्धा तिच्यावर बलात्कार करतो. हे बघून त्याच्याच गँगमधला एक डाकू (विक्रम मल्लाह) बाबू गुज्जरला ठार करतो व फुलनला वाचवतो. कारण तो फुलनच्या जातीचा असतो. पुढे तो फुलनशी लग्न करतो आणि तिला आपल्या गँगमध्ये सामिल करून घेतो.येथून फुलन डाकू बनते. त्यांची गँग अनेक गावांमध्ये जाऊन धाडी टाकते. श्रीमंतांना लुटून गरिबांना काही पैसे देते. गरिबांवर कोणी अत्याचार केला तर त्याला शिक्षा करते. अनेक गरीब मुलींचं लग्न लावून देते. ते गरिबांसाठी एक प्रकारे मसीहा बनतात. डाकू बनल्यानंतर फुलन पुट्टीलालनं केलेल्या अत्याचाराचा सूड घेण्याचं ठरवते. . सरपंच, पाटील व मायादीन यांनासुद्धा खूप बदडते. श्रीरामनं केलेल्या विक्रमच्या खुनाचा व तिच्या सोबत केलेल्या बलात्काराचा सूड घेण्याचं ठरवते. ती श्रीरामला शोधत शोधत एका गावात येते. त्या गावामधील २२ ठाकूर व्यक्तींना गोळ्या घालून ठार करते. कारण त्यांनी श्रीरामला लपण्यासाठी मदत केलेली असते.ही बातमी आगीच्या वेगानं देशभरात पसरते. पोलिसांचा बंदोबस्त कडक होतो. फुलनवर सरकार एक लाखाचं बक्षीस जाहीर करतं. पण फुलन कोणाच्याच हाती येत नाही. श्रीरामला शोधत असतानाच तिला महिती मिळते की, श्रीराम ठाकूरला त्याच्याच भावानं ठार केलं आहे. पोलीस इकडे फुलनचा शोध घेत असतात. ती त्यांना जिंदा किंवा मुर्दा हवी असते. फुलनवर खूप दबाव निर्माण होतो. ती विचारात पडते. तिच्या कुटुंबावरही खूप अत्याचार होतात. त्यामुळे फुलन आत्मसमर्पण करण्याचा निर्णय घेते. १२ फेब्रुवारी १९८२ रोजी ती मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री अर्जुनसिंह यांच्यासमोर आत्मसमर्पण करते. तेव्हा तिला बघण्यासाठी हजारो लोक येतात. तिला ११ वर्षं विनाखटला जेलमध्ये राहावं लागतं. १९९४ मध्ये तिच्यावरील सर्व आरोप माफ होतात. ती जेलमधून मुक्त होते…मुख्यमंत्री मुलायम सिंह यादव यांच्या आदेशाने फूलन देवी यांच्यावरील आरोप मागे घेण्यात आले . तुरुंगातून सुटल्यानंतर, त्या समाजवादी पक्षात सामील झाल्या आणि १९९६ च्या सार्वत्रिक निवडणुकीत उत्तर प्रदेशातील मिर्झापूर येथून भारतीय कनिष्ठ विधिमंडळ, लोकसभेत खासदार (एमपी) म्हणून निवडून आल्या. त्या फूलन देवी यांनी महिलांच्या हक्कांसाठी आणि गरिबांना चांगल्या सुविधा देण्यासाठी मर्यादित यश मिळवले. मला गावातील गरिबांना रुग्णालये, शाळा, वीज आणि स्वच्छ पाणी आणायचे आहे. बालविवाह थांबवण्यासाठी आणि महिलांचे जीवन सुधारण्यासाठी प्रयत्न केले अशा खासदार फुलन देवी यांना २५जुलै २००१ रोजी दुपारी १:३० वाजता ( IST ) फूलन देवी यांची नवी दिल्लीतील ४४ अशोका रोड येथील त्यांच्या घराबाहेर तीन अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली. अशा महान विरांगना फुलन देवी यांना विनम्र अभिवादन*या कार्यक्रमाचे अध्यक्ष महामित्र दत्ता वायचळे होते सुञसंचलन सगर भालेराव सर यांनी केले व प्रास्ताविक विजय मुठे तर आभार शरद जाधव यांनी मानले* याप्रसंगी महामित्र दत्ता वायचळे, आद्यक्रांतीकारक राघोजी ब्रिगेड चे सहसंस्थापक विजय मुठे माजी नगरसेवक रूपेशभाऊ मुठे, सगर भालेराव सर आशोक वरंदळ, हरिभाऊ वरंदळ, शरद जाधव, संतोष डमाळे दत्तात्रय आर्चय कार्तिक मुठे आदी उपस्थित होते
