
मखमलाबाद विद्यालयात ऑगस्ट क्रांती दिन, जागतिक आदिवासी दिन, संस्कृत दिन व रक्षाबंधन कार्यक्रम प्रसंगी नगरसेवक पुंडलिकराव खोडे,प्राचार्य संजय डेर्ले,उपप्राचार्य रावसाहेब उशीर, पर्यवेक्षक संजय हांडगे,सर्व शिक्षकवृंद,शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी.
मखमलाबाद { वार्ताहर } = मराठा विद्या प्रसारक समाजाचे श्री छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय मखमलाबाद येथे ऑगस्ट क्रांती दिन,जागतिक आदिवासी दिन,संस्कृत दिन व रक्षाबंधन कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून नगरसेवक पुंडलिकराव खोडे उपस्थित होते.याप्रसंगी व्यासपीठावर प्राचार्य संजय डेर्ले,उपप्राचार्य रावसाहेब उशीर,पर्यवेक्षक संजय हांडगे उपस्थित होते.सर्व मान्यवरांच्या शुभहस्ते प्रतिमापूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आले. प्राचार्य संजय डेर्ले यांनी प्रास्ताविक केले.कु.मयुरी ठाकरे,कु.लावण्या आहेर यांनी ऑगस्ट क्रांती दिनाबद्दल सविस्तर माहिती दिली

.९ ऑगस्ट १९४२ रोजी मुंबईच्या गवालिया टॅंक येथे महात्मा गांधींनी भारत छोडो आंदोलनाची हाक दिली. याच दिवशी गांधीजींनी “करा किंवा मरा” हा मंत्र दिला.या राष्ट्रव्यापी आंदोलनात अनेक क्रांतिकारकांनी आपले बलिदान दिले.राष्ट्र स्वातंत्र्यासाठी सर्वस्व अर्पण करणाऱ्या तेजस्वी क्रांतिकारकांना याप्रसंगी विनम्र अभिवादन करण्यात आले.

कु.हर्षदा पवार हिने आदिवासी दिना बद्दल सविस्तर माहिती दिली.जागतिक आदिवासी दिन दिन हा ९ ऑगस्ट १९९४ रोजी सुरू करण्यात आला. जगभरातील आदिवासी लोकांच्या हक्कांचे रक्षण आणि जागरूकता वाढविण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो.या दिवशी आदिवासी लोक पारंपरिक वेशभूषा,लोकनृत्य, लोकगीते व पारंपरिक कला सादर करतात.आदिवासी समाजाने खऱ्या अर्थाने स्वतःच्या जीवाची पर्वा न करता जंगलांचे रक्षण करून निसर्गाचा समतोल राखण्याचे मोलाचे काम केले आहे.इयत्ता ६ वी ड,९ वी ब च्या विद्यार्थिनींनी अतिशय सुंदर असे आदिवासी नृत्य तारपा पावरी सादर केले.यामध्ये कु.तनिष्का म्हैसधुणे,कु.सृष्टी चोथे,कु. जान्हवी,फडोळ,कु.आदिती नीलखन,कु.आदिती जगताप, कु.भावना भुसारे,कु.वृषाली रणमाळे व कु.भाग्यश्री थापा यांनी अतिशय सुंदर असे नृत्य सादर केले.कु.पृथ्वीराज भोये व कु.प्रज्वल महाले यांनी आदिवासी भाषेचे नमुने सादरीकरण अतिशय सुंदर केले.ऑगस्ट क्रांती दिन व जागतिक आदिवासी दिनातील इयत्ता ६ वी ड व इयत्ता ९ वी ब च्या सर्व सहभागी विद्यार्थ्यांना ज्येष्ठ शिक्षिका प्रमिला शिंदे,सोनल घडवजे,योगिता कासार,चैताली पिंगळे,वर्षा पाटील,अश्विनी वडघुले यांनी बहुमोल असे मार्गदर्शन केले.संस्कृत दिनानिमित्त कु. तनुश्री लोखंडे हिने संस्कृत भाषेतून व कु.जान्हवी गडदे हिने मराठी भाषेतून संस्कृतचे महत्त्व सांगितले.संस्कृत भाषेवरतीच आपली संस्कृती आधारलेली आहे.जीवनातही संस्कृत भाषेचे अनन्य साधारण महत्त्व आहे.संस्कृत दिनाच्या विद्यार्थ्यांना ज्येष्ठ शिक्षिका योगिता कापडणीस व अश्विनी वडघुले यांनी बहुमोल असे मार्गदर्शन केले.संस्कृत दिनाचे सूत्रसंचालन अमृता गीते हिने केले.कु.स्वराली परदेशी हिने रक्षाबंधनाचा अर्थ व माहिती छान पद्धतीने सादर केली.ज्येष्ठ शिक्षिका प्रमिला शिंदे यांनी रक्षाबंधन सणाविषयी विद्यार्थ्यांना अतिशय सुंदर अशी माहिती दिली.भारतीय संस्कृतीतील हा एक महत्त्वाचा सण असून बहीण भावाच्या प्रेमाचा हा एक उत्सव असतो.”हर घर तिरंगा” उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांनी तिरंगा रंगामध्ये अतिशय सुंदर अशी राखी तयार केली.हरित सेना अंतर्गत विद्यार्थ्यांनी पर्यावरण पूरक अतिशय सुंदर अशा राख्या तयार केल्या व या सर्व राख्या शालेय परिसरातील वृक्षांना मान्यवरांच्या शुभहस्ते बांधण्यात आल्या.

या सर्व विद्यार्थ्यांना ज्येष्ठ शिक्षिका स्वाती होळकर,मनीषा कारे, वैशाली ठाकरे,चैताली पिंगळे यांचे बहुमोल असे मार्गदर्शन लाभले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्येष्ठ शिक्षिका प्रमिला शिंदे, कु.समीक्षा दिघे,कु.जिया गुंजाळ तर आभार प्रदर्शन कु.मानसी कदम हिने केले.कार्यक्रमास सर्व शिक्षकवृंद,शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
