
-**सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित २९९३ वा दिवस* तुम्ही जगातल्या थोर पुरुषांची चरित्रे वाचली तर ते स्थितप्रज्ञ होते असे तुमच्या ध्यानी येईल. कोणत्याही गोष्टीमुळे त्यांच्या मनाचा तोल ढळत नसे. म्हणून जो संतापी असतो त्याच्या हातून फारसी कार्य घडत नाही. ज्याचा पारा कधी चढत नाही त्याच्या हातून मोठी कामे घडतात. संताप, विद्वेष वा अन्य विकारांच्या आहारी जाणाऱ्यांच्या हातून काम तर होत नाहीच, उलट तो स्वतःचा विनाश करून घेतो. शांत, क्षमाशील, समतोल वृत्तीची माणसेच फार मोठे कार्य करू शकतात. विकाराची प्रत्येक लहर संयमाने थोपवा. ते तुमच्या हिताचे आहे.
*स्वामी विवेकानंद…* *●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●
*★ भारतीय सौर १९ श्रावण (नभमास) शके १९४७*
★ श्रावण कृष्ण /वद्य १
★ शालिवाहन शके १९४७
★ शिवशक ३५१
★ विक्रम सम्वत् २०८२
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ रविवार दि. १० ऑगस्ट २०२५ ★ १८९४ केंद्रीय मंत्री, भारताचे चौथे राष्ट्रपती वराह वेंकट गिरी यांचा जन्मदिन
.★ १९८६ पंजाबमधील सुवर्ण मंदिरात “ऑपरेशन ब्लू स्टार” ही लष्करी कारवाईच्या वेळी भारतीय लष्करप्रमुख असलेले महावीरचक्र विजेते जनरल अरुण कुमार वैद्य यांची अतिरेक्यांना पुणे येथे हत्या केली. (स्मृतीदिन )
★ आंतरराष्ट्रीय बायोडिझेल दिन.
