
नांदगाव ( प्रतिनिधी ) ज्या प्रमाणे तुम्ही एखाद्या स्पर्धेत /परीक्षेत यश संपादन करतात व तुमचे बक्षीस देऊन कौतुक करतात व त्यातून तुम्हाला अधिक प्रेरणा मिळते व अधिक उत्साहाने अभ्यास करतात त्याच प्रमाणे जेव्हा रक्षाबंधन निमित्त आम्हाला देशातील भगिनी राखी पाठवितात तेव्हा आम्हाला एखाद्या स्पर्धेत यश मिळविल्या सारखा आनंद होत असतो तोच आनंद आज तुम्ही स्वता: राखी बांधल्यावर होत आहे असे उद्गार संभाजी नगर ५० महारष्ट्र बटालियन एन.सी.सी चे सी.ओ.कर्नल बी.पी.एस.ठाकूर पंजाब रेजिमेंट यांनी रक्षाबंधन कार्यक्रम प्रसंगी काढले..

नाशिक शिक्षण प्रसारक मंडळ संचलित व्ही.जे. हायस्कूल,नांदगाव हे विद्यालय नेहमीच सामाजिक बांधिलकी जपणारे उपक्रम राबवीत असते.समाजातील काही घटक असे असतात कि ते नेहमी समाजाच्या सेवेसाठी पुढे असतात असे आपले भारतीय सैनिक या सैनिकांना रक्षाबंधनाचा आनंद मिळावा व सामाजिक बांधिलकी जोपासावी यासाठी विद्यालयात विद्यार्थीनिनी संभाजीनगर येथे जाऊन अनोखे रक्षाबंधन साजरे केले.

विद्यालयात रक्षाबंधन निमित्त “ एक राखी जवनों के नाम ”उपक्रम घेण्यात आला या उपक्रमात शाळेतील विद्यार्थिनी आपापल्या पद्धतीने सैनिकांबद्दल असलेली भावना व्यक्त करणारे पत्र लिहिले व ते पत्र व राखी असे पाकीट मध्ये टाकून जमा केले व जमा झालेले पत्रासाहित राख्या एन.सी.सी. च्या १० विद्यार्थांनी संभाजीनगर येथे ५० महारष्ट्र बटालियन ठिकाणी सैनिकासोबत रक्षाबंधन साजरे केले.प्रथम एन.सी.सी. शिक्षक राजेश भामरे यांनी ह्या उपक्रमाची माहिती दिली देऊन विद्यार्थिनीनि उपस्थित सैनिकांना घरगुती पद्धतीने औक्षण करून राख्या बांधल्या व सोबत आणलेले पत्र त्यांना देण्यात आले ते पत्र वाचून सैनिकहि भावनिक झाले

त्यांच्या चेहऱ्यावर एक सुखद आनंद मिळाला असे दिसले या प्रसंगी सी.ओ. बी.पी.एस.ठाकूर, लेफ्टनंट कर्नल कीर्ती मुंडले,एस.एम.अशोक भट,सुभेदार चव्हाण व सैनिक उपस्थित होते त्यांनी या शाळेच्या उपक्रमाचे कौतुक केले व यामुळे आम्हाला देशसेवा करण्यासाठी बळ मिळते अशा भावना व्यक्त केल्या . काही पत्र व राख्या सैनिकी सेंटरला पाठविण्यात आल्या.या उपक्रमासाठी शाळेतील ए.सी.सी. शिक्षक राजेश भामरे , कलाशिक्षक विजय चव्हाण ,निवेदिता सांगळे परिश्रम घेतले.व उपक्रमासाठी शालेय समिती अध्यक्ष संजीव धामणे, मुख्याध्यापक लक्ष्मीकांत ठाकरे ,उपमुख्याध्यापक जोगेश्वर नांदुरकर यांचे मार्गदर्शन लाभले.तसेच शाळेतील एन.सी.सी.च्या विद्यार्थिनी व इतर विद्यार्थिनी व शिक्षकांचे सहकार्य लाभले.
