
नाशिकरोड:(प्रतिनिधी)- पळसे येथील नाशिक सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावरील माध्यमिक विद्यालयात पर्यावरणपूरक होळी पेटवून होळीचा सण साजरा करण्यात आला. मुख्याध्यापक अरुण पगार यांच्या मार्गदर्शनाखाली शालेय परिसराची स्वच्छता करण्यात आली. साफसफाई करून विद्यार्थ्यांनी केरकचरा एकत्र करत त्याची होळी केली. यावेळी माजी मुख्याध्यापक सुनील बर्वे आणि विद्यार्थ्यांसह सर्व शिक्षक-कर्मचारीवृंद उपस्थित होते. शिक्षक रवींद्र मालुंजकर यांनी होळीचे महत्त्व सांगत पर्यावरण रक्षणाचा वसा घेण्याचा संदेश दिला.फोटोओळी:- नासाका विद्यालयात पर्यावरणपूरक होळीचा सण साजरा करताना मुख्याध्यापक अरुण पगार, माजी मुख्याध्यापक सुनील बर्वे यांच्यासह विद्यार्थी आणि शिक्षक-कर्मचारीवर्ग.
