
सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित २९८९ वा दिवस काही करण्याच्या आधी मत्सराचा कलंक आपल्या जीवनातून कायमचा दूर करावा. कुणाबद्दलही द्वेष, मत्सर, इर्षा बाळगू नका. सत्कार्य करणाऱ्या प्रत्येकाला मदत करण्यासाठी सदैव तत्पर असा. त्रिलोक्यातील प्रत्येक जीवाचे कल्याण होवो, प्रत्येकाचे मंगल होवो अशी कामना करूया. व्यापक बनणे, विशाल दृष्टिकोन ठेवणे, संकुचित क्षेत्रातून बाहेर पडणे, सर्वांशी मिळून मिसळून राहणे, हळूहळू विश्वाशी एकरूप होणे ही आपली अंतिम ध्येय आहेत. प्रेम, सच्चेपणा, धीर, सदभाव याची आज नितांत आवश्यकता आहे. आपल्याला प्रबल कर्मयोग हवा हृदयात अदम्य साहस, अनंत बल हवे.
*स्वामी विवेकानंद…* *●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●**

★ भारतीय सौर १५ श्रावण (नभमास) शके १९४७*
★ श्रावण शुध्द /शुक्ल १२
★ शालिवाहन शके १९४७
★ शिवशक ३५१
★ विक्रम सम्वत् २०८२
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ बुधवार दि. ६ ऑगस्ट २०२५ ★ १९२५ भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे एक संस्थापक, जहाज गटाचे नेते, राष्ट्रगुरु सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांचा स्मृतिदिन.
★ १९४५ दुसऱ्या महायुद्धात अमेरिकेने जपानच्या हिरोशिमा या शहरावर अणुबॉम्ब टाकला.
★ जागतिक अण्वस्त्रविरोधी दिन.
