
सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित २९८८ वा दिवस निराश होऊ नका, तुम्ही केलेले निष्काम कर्म कोणीही बदलू शकत नाही. प्रकृतीही काही प्रकृतीला नष्ट करू शकत नाही. तुमची प्रकृती तुमचे स्वरूप तुमचे कर्म शुद्ध आहे. ते लाखो युगे दडलेले का असेना अखेर ते विजयी होऊन प्रकट होणारच. म्हणून अद्वैत हे प्रत्येकाला आशावादी बनवते. ते कुणालाही निराश बनवत नाही. अद्वैत हे भयाने धर्माचरण करावयास शिकवत नाही. तुमच्या हातून चूक होताच तुमचा घात करावयास टपलेल्या सैतानाची ते कदापी शिकवण देत नाही. असल्या सैतानाशी त्याला काहीही कर्तव्य नाही. ते असे म्हणते की, तुमचे भाग्य तुमच्या हातीच आहे. तुमच्याच कर्माने तुमच्यासाठी हे शरीर घडविले आहे. दुसऱ्या कोणी नव्हे. हीच मोठी आशादायक गोष्ट आहे. जे मी करून बसलो ते मी नष्ट देखील करु शकेन.
स्वामी विवेकानंद… *●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●*
*★ भारतीय सौर १४ श्रावण (नभमास) शके १९४७
*★ श्रावण शुध्द /शुक्ल ११
★ शालिवाहन शके १९४७
★ शिवशक ३५१
★ विक्रम सम्वत् २०८२
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ मंगळवार दि. ५ ऑगस्ट २०२५ ★ पुत्रदा एकादशी 🚩🚩🚩🚩🚩
★ १८९० इतिहासकार, लेखक, वक्ते, मराठी शुध्दलेखन महामंडळाचे अध्यक्ष, पुणे विद्यापीठाचे कुलगुरू महामहोपाध्याय दत्तो वामन पोद्दार यांचा जन्मदिन.
★ १९९२ स्वातंत्र्यसैनिक, सन १९४२ च्या आंदोलनातील अग्रणी नेते, तत्त्वचिंतक, विचारवंत, सामाजिक कार्यकर्ते, भारतीय समाजवादी पक्षाचे संस्थापक अच्युतराव पटवर्धन यांचा स्मृतिदिन.
*संकलन – प्रा. अमोल श्रीकृष्ण अहिरे, नाशिक*


