
नाशिक (प्रतिनिधी)=नाशिक येथील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या जनरल पोस्ट ऑफिसच्या येथे पैसे भरणे, पैसै काढणे, बचत योजना, रजिस्टर करणे, विविध फार्म घेणे, डिपॉझिट करणे यामुळे खूप गर्दी असते परंतू याठिकाणी चुकीच्या बैठक व्यवस्थेमुळे ज्येष्ठ नागरिक व महिला यांना मनस्ताप होत असून रांगेमध्ये अर्धा ते पाऊण तास कधी एक तास उभं राहताना विविध आजारांचा त्रास असल्याने नागरिकांना विविध समस्यांना सामोरं जावं लागत असून दमछाक होत आहे .ज्येष्ठ नागरिक व महिला यांना अधिक काळ ताटकळत उभे राहावे लागतात मात्र रांगेच्या बाजूला खुर्च्यांचे व्यवस्था करण्याऐवजी रांगेच्या खूप अंतरावर खुर्च्यांची चुकीची व्यवस्था केल्याने रांगेत उभं राहिलं नाही तर नंबर जाईल नंबर जाईल म्हणून नागरिकांना अर्धा ते एक तास ताटकळत उभे रहावे लागते सर्व्हर डाऊन असणे , लाईट जाणे यामुळे वेळ जातो व नागरिकांना त्रास होतो मात्र याची व्यवस्थापनाने कोणत्याही प्रकारची दखल न घेतल्यामुळे ज्येष्ठ नागरिक व महिला यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे

तरी यामध्ये दुरुस्ती करून बैठक व्यवस्था रांगेच्या बाजूला करावी , जेष्ठ नागरिकांसाठी महिलांसाठी वेगळी रांग अथवा वेगळे काऊंटर असावे, जेणेकरून काही मिनिटांसाठी ज्येष्ठ नागरिक व महिला यांना बसता येईल अशा प्रकारची मागणी जेष्ठ नागरिक व महिलांकडून होते आहे.याबाबत जेष्ठ नागरिक संघटना निवेदन देणार असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र जागरूक नागरिक भूषण नागरे , सागर सोनवणे यांनी समस्या लक्षात आणून दिल्यावर मुख्य पोस्ट मास्तर यांनी ताबडतोब आसन व्यवस्था बदलण्यासाठी सूचना दिल्या.

..त्यामुळे अनेक जेष्ठ नागरिकानी व महिलांनी समाधान व्यक्त केले.जागरूक नागरिकांनी वेळोवेळी आम्हाला सूचना केल्यास अजूनही सकारात्मक बदल करून ग्राहकांच्या सोयीसाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
