
ओझर:(प्रतिनिधी ) दि.१० वार्ताहर येथील ‘मविप्र’ संचालित माधवराव बोरस्ते विद्यालयात भारताच्या आद्यशिक्षिका महिलांचे प्रेरणास्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त मुख्याध्यापक सोपान वाटपाडे उपमुख्याध्यापक धैर्यशील पाटील ज्येष्ठ शिक्षिका मंगल सावंत सरोज खालकर यांनी प्रतिमेचे पूजन करून विनम्र अभिवादन केले. प्रास्ताविक शिक्षिका मंगल सावंत यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना मुख्याध्यापक सोपान वाटपाडे म्हणाले, बहुजनांच्या शिक्षणासाठी व उद्धारासाठी स्वतःला झोकून देऊन इतरांना लढायला प्रवृत्त करणाऱ्या महान शिक्षणतज्ञ क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंचे विचार सर्वांना प्रेरणादायी असल्याचे त्यांनी सांगितले. फलक रेखाटन कलाशिक्षिका मोनाली निकम यांनी केले. कार्यक्रमास सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन शिक्षक नरेंद्र डेरले यांनी केले.
