
सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित २८४२ वा दिवस* लहानपणापासूनच करुणात्मक, बलदायक, विधायक, रचनात्मक असे उपयुक्त विचार त्यांच्या मेंदूत शिरू द्या. असल्याच विचारांचा प्रभाव स्वतःवरही पडू द्या. दुबळेपणा आणतील, पंगू बनवतील अशा विचारांना थारासुद्धा देऊ नका. दृढपणे सदा आपल्याशी म्हणा – “मी तोच आहे, मी तोच आहे – मी आत्मा आहे.” तुमच्या हृदयात हेच एखाद्या संगीतासारखे अहर्निश झंकृत होत राहो. अगदी मृत्यूसमयी देखील ‘सोऽहं’ ‘सोऽहं’ असा घोष करीतच प्रयाण करा. हेच सत्य आहे की हे जग चालविणारी महाशक्ती तुमच्या ठायी आहे. स्वामी विवेकानंद… ●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो● भारतीय सौर २० फाल्गुन शके १९४६*
★ फाल्गुन शुध्द /शुक्ल १२
★ शालिवाहन शके १९४६
★ शिवशक ३५१
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२६
★ मंगळवार दि. ११ मार्च २०२५
★ १६८९ हिंदवी स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज यांचा बलिदान दिन.
★ १८६३ बडोदा संस्थानचे महाराज, मालेगाव तालुक्यातील कौळाणे निं. चे भूमिपुत्र सयाजीराव गायकवाड यांची जयंतीदिन.
