
पुणे (प्रतिनिधी ) सुप्रसिद्*नक्षत्राचं देणं काव्यमंच, मुख्यालय भोसरी पुणे ३९च्या वतीने कवी अनिल जाधव यांच्या लेखणीतून साकारलेला ‘टेंभा’या काव्यसंग्रहाचे प्रकाशन नुकतेच संपन्न झाले. कवी अनिल जाधव हे देशात परदेशात वास्तव केलेले व माय मराठीची चळवळ आंतरराष्ट्रीय स्तरावर घेऊन जाण्यासाठी प्रयत्नशील असणारे एक उत्तम कवी आहेत. साईराजे पब्लिकेशन च्या वतीने उत्तम काव्यसंग्रहाची निर्मिती करण्यात आली आहे.जागतिक महिला दिन हा कवी अनिल जाधव यांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त टेंभा चे प्रकाशन करण्यात आले आहे. कवीचं अनेक वर्षांचे वाचन, निरीक्षण, परीक्षण, समीक्षण व तीन परदेशी देशांचा प्रवास करणारे हे अनुभव संपन्न कवी आहेत. याप्रसंगी कृष्णकुमार गोयल म्हणाले की,”ही संस्था कवींना प्रकाशात आणण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न करत आहे. कवींची दर्जेदार पुस्तके प्रकाशनाचे परंपरा त्यांनी जपली. आज कवी अनिल जाधव यांचा टेंबा काव्यसंग्रह प्रकाशन होताना अशीच अतिशय आनंद होत आहे. आपल्या जीवनातील अनुभव मांडत… विचारांचा टेंबा आयुष्य प्रकाशमान करण्यासाठी उपयुक्त असणारा हा काव्यसंग्रह आहे. भविष्यातील काव्य व साहित्य वाटचालीसाठी कवीला शुभेच्छा”या काव्यसंग्रह प्रकाशन वेळी नक्षत्राचं देणं काव्यमंच अध्यक्ष प्रा. राजेंद्र सोनवणे उपस्थित होते.
