
नांदगाव (प्रतिनिधी) मविप्र संचलित न्यू इंग्लिश स्कूल नांदगाव मध्ये जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमाचा अध्यक्षस्थानी सौ. डॉ.योगिणी चव्हाण मॅडम उपस्थित होत्या. विद्यालयाचा मुख्याध्यापिका श्रीमती काळे मॅडम यांनी जागतिक महिला दिनानिमित्त अध्यक्षा व विद्यालयातील सर्व शिक्षिका भगिनींना पुष्पगुच्छ देऊन सन्मानित केले. तसेच सर्व महिला शिक्षिका भगिनींनी प्रतिमा पूजन केले. याप्रसंगी ज्येष्ठ शिक्षक अशोक मार्कड सर यांनी स्त्री हे संस्काराचे भांडार आहे , हे आपल्या मनोगतून व्यक्त केले. तसेच विद्यालयाचा मुख्याध्यापिका श्रीमती काळे मॅडम यांनी स्त्री आणि संस्कृती यांची आपल्या मनोगतून सांगड घातली. अध्यक्ष भाषणामध्ये डॉ. चव्हाण मॅडम यांनी स्त्रियांनी आपल्या आरोग्याची काळजी कशी घ्यावी, तसेच आपले स्वसंरक्षण कसे करावे याविषयी माहिती सांगितली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विद्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री आहेर एस.एस. यांनी केले.
