
लेखक – शंकर नामदेव गच्चे नांदेड मोबाईल नंबर-८२७५३९०४१०

एकविसाव्या शतकातील स्त्रियांपुढे सर्वात मोठे आव्हान कोणते असेल तर स्वतःचा सन्मान करायला शिकणे. स्वतःच्या स्त्री त्वाचा आदर करणे आणि खंबीर बनून या धगधगत्या युगाला सामोरे जाणे. अत्याचारापासून स्वतःला सोडून घेणे. कारण जे भूतकाळात घडले तेच वर्तमान काळातही घडत आहे.आजही द्रौपदीचे वस्त्रहरण चालू आहे .संपूर्ण समाज कौरवांनी जिंकला आहे. पांडव माना खाली घालून बसले आहेत. म्हणूनच सखे तुझी आत्मशक्ती जागृत कर. तुझी आत्मशक्ती हाच तुझा अलंकार आहे .कापून काढ त्या धारदार शस्त्रांनी अन्याय करणाराचे मनगट ..कारण आजपर्यंत तुला फक्त सजविले अलंकार ,सौंदर्य ,देवत्व यात तुला बंदिस्त केलंय.त्यातच तुझ दास्यत्व दडल आहे. संस्कृतीच्या नावावर पुत्रवती सतीत्व त्यागीपणा यांचे ओझे लादून तू त्या गौरवास्पद प्रतिमेत अडकताना दिसतेस. स्वातंत्र्यापेक्षा गुलामगिरीत आनंद मानणाऱ्या स्त्रिया अधिक असतात कारण गुलामगिरीत सुरक्षितता असते पण त्याचबरोबर खुजेपण असते.दास्य असते, अपमान असतो. विटंबना असते म्हणूनच सौभाग्यवती, कुमारिका, श्रीमती सारख्या उपाधींची सवय स्त्रीचे पुरुष सापेक्ष अस्तित्व अधोरेखित करते. लग्नाअगोदर कुमारी, लग्नानंतर सौभाग्यवती,विधवा असल्यास श्रीमती लिहिलं जातं.काय गरज आहे समाजापुढे स्वतःच्या चारित्र्याची चिरफाड करण्याची? स्वतःचे पुरूष सापेक्ष अस्तित्व क्षणोक्षणी सिद्ध करण्याची?गुलामीच लक्षण असणार मंगळसूत्र गळ्यात का घालावं?ही सर्व बंधनं जोखडं स्ञीयांसाठीच का? लग्नानंतर पाय वाकडा पडू नये, म्हणून देखिलपायात बेड्या स्ञीयांनीच घालायच्या?परंपरांच्या नावाखाली अंधश्रद्धा समाजात आल्या त्या अंधश्रद्धेमुळे सर्वाधिक शोषण आपल्या भगिनीवर्गाचं झालं आहे.आपल्या अखंड स्वराज्यात स्त्रियांचा आदर करणारे छत्रपती शिवाजी महाराज स्वतःची वहिनी जिवंतपणी सती प्रथेच्या नावाखाली जिवंत जाळली जात असताना पाहून पेटून उठणारे राजाराम मोहनराय, स्त्री शिक्षणाचे प्रणेते महात्मा फुले, सावित्रीबाई फुले,स्ञीयांच्या स्थितीवर भाष्य करणाऱ्या ताराबाई शिंदे, स्त्रियांच्या हक्कासाठी लढणारे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार अजूनही आपल्या समाजातील तळागाळापर्यंत पोहचले नाहीत ही खरी शोकांतिका आहे.

पिता रक्षती कौमार्य, भ्राता रक्षती यौवने. रक्षन्ती स्थवरे पुञ,न स्ञी स्वातंत्र्य मर्हती या ओळी आपला भारत देश कीती दिवस घोकत बसणार ? एखाद्या शारीरिक बलत्काराच्या आघातानंतर तशाच पद्धतीचा मानसिक आघात तिला न्यायालयातही सहन करावा लागतो.तेच तेच प्रश्न विचारून त्याच त्याच दुखण्यातून तिला पुन्हा पुन्हा जावे लागते. म्हणजे हा तिच्यावर होणारा दुसरा बलत्कारच होय. समोर बलत्कार होत असताना प्रत्यक्ष पाहणाऱ्या एकाच्याही रक्ताला उकळी फुटत नाही.म्हणूनच सखे दुसरा मदतीला येईल ही आशा सोडून दे .अश्रू ढाळून उपयोग नाही कारण लोकशाही च्या युगात अश्रूंचे मोल संपले आहे.म्हणून म्हणावेसे वाटते. ढाळू नकोस अश्रु पुसणार नाही कोणी ही हाक यातनांची ऐकणार नाही कोणी जिवनात जगण्याचे मार्ग जरी खुंटले गं, या तुझ्याच देवतानी तुलाच लुटले गं!!म्हणूनच अश्रूंना बांध घाल आज राज्यशाही युग संपून लोकशाहीच्या प्रगत युगात द्रौपदीचे आक्रंदन खरंतर कानावर पडू नये पण आजही शोषण आणि लाचारी याच्या नित्य दर्शन घडावं हा आमच्या ज्ञानाचा, धर्माचा आणि संस्कृतीचा पराभव आहे.पण आम्हाला स्त्रियांच्या हत्यांची इतकी सवय झालीय की क्रिकेटमधल्या रनसंख्येप्रमाणे आपण निर्विकारपणे ती मोजत असतो. स्त्रिया बलत्कार होईल अगर होऊ शकतो या भीतीने व त्याच्या दडपणाखाली स्वातंत्र्य सोडून भीत-भीत जगतात.त्यांचे माय बापही तिच्या चारीञ्यावर एखादा कंलकीत शिक्का बसेल म्हणून १० वी १२ वीला प्रथम येणाऱ्या मुलीचेही लग्न लावून आपली सुरक्षा शोधतात.याच भितीपोटी मुली उच्च शिक्षणा पर्यंत पोहचत नाहीत.आणि आमचा सुशिक्षित म्हणून घेणारा समाज मुलीच लग्न केलं की मोठा पराक्रम केल्याच्या आविर्भावात वागतो. म्हणून स्त्रीचे स्वातंत्र्य हिरावून घेऊन तिची राजकीय, सामाजिक पिळवणूक करून तीला गुलाम बनविण्यासाठी व गुलामासारखे वागविण्यासाठी पुरुषाने शोधून काढलेले हे महाभयंकर शस्त्र आहे. बऱ्याचवेळेला स्त्रीला इच्छा नसतानाही ही गुलामी पत्करावी लागते. याचे सर्वात महत्वाचे कारण म्हणजे बहुतेक स्त्रीयांचे असलेले पारतंत्र्य होई.तळ्याकाठचं गवत तळ्याशी सलगीनंच वागतं, कारण त्याला जगण्यासाठी तळ्यातलं पाणी लागतं”आणि हीच स्त्रीची खरी खरी मेख आहे. यक्षप्रश्न आहे म्हणूनच सखे तू जागृत हो. आपल्याला स्त्रीदाक्षिण्य नको, मेहरबानी नको, देवी म्हणून स्त्रीची पूजा करण्याची गरज नाही, कारण स्त्री ही देवी नाही, दासी तर नाहीच नाही ती आहे फक्त माणूस तिला हवे आहेत अधिकार .अधिकारांचा उपयोग करण्यासाठी मिळवायचं सामर्थ्य यालाच म्हणतात सक्षमीकरण! यालाच म्हणतात स्त्री सबलीकरण! जागतिकरणाचं वारं वेगाने वाहू लागलयं विवाहसंस्था मोडकळीस येऊ लागल्या आहेत. स्त्री सक्षम झाली तर तिचा वरचढपणा जुमानायला पुरूष तयार होत नाहीत. आणि स्व शक्तीची जाणीव झालेली स्त्री दबून राहायला तयार नाही.मला हवे ते जर मिळणार नसेल तर त्यातून निर्माण होईल स्पर्धा, संघर्ष, काॕन्ट्रक्ट मॕरेजसारख्या पध्दतीचा शिरकाव होत आहे. भिकाई कामा, जिजाऊ ,सावित्री, अहिल्यादेवी, महाराणी ताराराणी किरण बेदी, कल्पना चावला,रझिया सुलतान,इंदिरागांधी,प्रतिभा पाटील यासारख्या मोजक्याच तारका आकाशात चमकत आहेत . महिला मेळावे,महिला सबलीकरण कायदे करून उपयोग नाही तर आचरण महत्त्वाचे आहे.सखे तू स्वतःच स्वतःचा सन्मान कर.कधीच स्वतःला कमजोर समजू नको.तुझा जन्म फक्त त्यागासाठी नाही तर अधिकारांसाठी ही आहे. या कौरवांच्या राज्यात आपल्या मदतीला कोणी येईल ही अपेक्षा करणेही चुकीचे आहे. तेव्हा आपण आपल्याला सबल बनुया. एकीवर अन्याय होईल तेव्हा हजारजणी रस्त्यावर येऊ. तिचे दुःख हे माझे दुःख मानूया. अन्याय कोणावरही होवो.सर्वजण तिला धीर देऊ. खंबीर होऊन साथ देऊ. संविधानाच्या अगोदर या देशात कोणता कायदा होता? तर संविधानाच्या अगोदर या देशात मनुस्मृतीचा कायदा होता. १) मनुस्मृती म्हणत होती स्त्री ही मरेपर्यंत गुलाम असली पाहिजे ‘ न स्त्री स्वातंत्र्य महर्ती ‘ लहानपणीच तिने वडिलांच्या ताब्यात राहिल पाहिजे, तरुणपणी तीन पत्तीच्या ताब्यात राहिल पाहिजे, म्हातारपणी मुलाला ताब्यात राहिल पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले जाळा तो कायदा आणि भारतीय संविधानात स्त्री-पुरुष समतेचा कायदा केला तिला वडीलांच्या संपत्तीत अर्धा वाटा तिला पतीच्या संपत्तीत अर्धा वाटा दिला. २) मनुस्मृती म्हणत होती जर एखाद्या महिलेचा पती मेला तर तिला पांढरी साडी नेसायला द्या.तिला कोणत्याही कार्यक्रमात सहभागी होऊ देऊ नका तिला एकलकोंड जीवन जगू द्या. मनुस्मृती म्हणत होती जर एखाद्या पुरूषाची बायको मेली तर त्याने दहा लग्न केले तरी चालतील.डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले घाबरू नकोस आणि भारतीय संविधानात यांनी विधवा पुनर्विवाहाचा कायदा केला. ३) मनुस्मृती म्हणत होती पतीला परमेश्वर मान मग तो जाळणारा असू दे,माराणारा आसू दे,छळणारा असू दे,दारूड्या असू दे ,गंजाड्या असू दे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले पतीला परमेश्वर नाही मित्र मान आणि भारतीय संविधानात स्त्री-पुरुष समतेचा कायदा केला.डाॕ.बाबासाहेब आंबेडकर म्हणतात,”कौणत्याही देशाची प्रगती ही त्या देशातील स्त्रीयांच्या प्रगतीवरून मोजावी.”कायद्यानेच समाज परिवर्तन होते असे नाही. परिवर्तनाला पूरक अनेक घटक आहेत. शिक्षण ,संस्कार ,नैतिकता, प्रबोधन, आर्थिक व्यवहार आणि राजकीय प्रक्रिया यासारख्या अनेक घटकांचा संयुक्त परिपाक हा सामाजिक परिणाम असतो व याला कायद्याची जोड असते. म्हणूनच स्त्री-पुरुष समानतेसाठी कायद्याच्या जोडीबरोबरच इतर घटकांचा अंगीकार करणे गरजेचे पुढारलेली स्वतःला पुरोगामी मानणारी माणसं येथील व्यवस्था जोपर्यंत स्त्रियांना योग्य संधी देत नाही तोपर्यंत स्त्री-पुरुष समानता प्रत्यक्षात येणार नाही व ज्या दिवशी स्त्री-पुरुष समानता प्रत्यक्षात उतरेल तो सुदिन म्हणावा लागेल हा सुदिन आणणारी व्यवस्था येथे यावी आणि स्त्री-पुरुष ही दोन चाके परस्पर पोषक निके!गाव नांदेल स्वर्गिय सुखे!तुकड्या म्हणे. याप्रमाणे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना अभिप्रेत असलेला समाज इथे बघायला मिळो ही अपेक्षा.भारतीय संविधानात स्त्री पुरूष समता आहे.गुरूजीला ३०,००० पगार,मॕडमला ३०,००० पगार का?तर समान काम समान वेतन.समाजात आहे स्त्री -पुरुष समता?शेतात सोयाबीन कापायला गेल्यावर गड्याला ३०० रूपये हजरी,बाईला १०० रूपये हजरी का?सोयाबीनच कापायचय ना?तरी तो मध्येच पाणी पियायला जाईल,बीडी फुकत बसल.बाईच आपल चालूच असत.कुठ झिरपला समाजात कायदा.स्त्रीया ग्रामपंचात,पंचायत समिती,जिल्हा परिषदेत निवडून येतात सभापती सदस्य होतात पण सही करण्यापलीकडे त्यांना अधिकार नसतो.जिल्हा परीषदेत महीला सभापती असेल तर तीचा नवरा सांगतो मीच सभापती आहे. अस असल तरी महिलांकडे 5 सर्वश्रेष्ठ गुण आहेत जे पुरुषांकडे नाहीत.त्यांच्या जोरावर त्या जग पादाक्रांत करू शकतात. कोणते गुण आहेत ते ?पहिला गुण आहे १)हट्ट – घरामध्ये पोराचा हट्ट पुरा होतो का बायकोचा ? हट्ट एक हत्यार आहे.जिजामातेने हट्ट केला. नवरा मेला तरी सती जाणार नाही पोराला राजा केल्याशिवाय मरणार नाही. छत्रपती शिवाजी महाराज राजा झाल्याशिवाय मेल्या नाहीत. नंबर २) नवनिर्माण क्षमता – नव निर्माण म्हणजे लेकराला जन्म देणे नाही.राञीचा भात ऊरला तर त्याचा फ्राय कोण करत?शिळ्या भाकरी उरल्या तर त्याचे कुटके बनवणे,टाकून दिलेल्या साड्याच्या सतरंज्या,गोधडी कोण बनवत?आंब्याच लोणच,मुरंबा कोण बनवत.. नंबर ३) अचूक निर्णय क्षमता – कठीण प्रसंगी अचूक निर्णय घेण्याची क्षमता महिलांमध्ये आहे पुरुषांमध्ये नाही. पाटील घरी दहा-बारा माणसे घेऊन येतो आणि आवाज येतो पाटलीनबाई दहा बारा कप चहा बनवा.त्यावेळी बाई म्हणत नाही घरात साखर नाही पत्ती नाही .चाळीस रूपये द्या साखर पत्ती आणते आणि मगच चहा बनवते.बाई शेजारणी पाजारणीकडून उसणी साखर पत्ती आणतेआणि प्रसंग निभाऊन नेते. नंबर ४) स्त्री कमजोर दिसते पण ती कमजोर नाही. भारतीय व्यवस्थेने तिला शोषित बनवलं,अबला बनवल. स्त्री अबला नाही सबलाच आहे.जर जुळी मुलं झाली एक मुलगा आणि एक मुलगी झाली तर ९९% मुलगाच मरतो निसर्ग निर्मात्यांनी तिला मजबूत बनवून पाठवलंय.तिला २००% रोग प्रतिकार क्षमता देऊन पाठवलय. नवरा जितक्या वेळा आजारी पडतो त्याच्या exact ५०% वेळाच बायको आजारी पडते.एखाद्या बाईचा नवरा तरुणपणी मरतो दोन लेकरं पाठीमागे ठेवून मरतो. तेव्हा ती बाई ऐवढ्या ताकतीने लढते. मनाचा निर्धार करते की माझ्या मुलाचं भविष्य घडवण्याची जबाबदारी माझ्यावर आहे.तुम्हाला समाजात कीती तरी उदाहरणे सापडतील की नवरा मेल्यावर त्या बाईने वाटेल ते कष्ट करून आपला मुलगा नौकरीला लावला.मुलीच चांगल्या घरी लग्न केल.पण एखाद्याची जर बायको मेली दोन लेकर टाकून तर या पठ्ठ्यान मुलाला नौकरीला लावलं मुलीचं चांगल्या घरी लग्न केलं असं एक तरी उदाहरण समाजात आहे का ? तुमच्या शेजारी पाजारी आहे का? कुठेच दिसणार नाही बायको मेली की हा पठ्ठ्या दारु पिऊन झिंगत राहतो. राजमाता जिजाऊ, राजमाता अहिल्यादेवी होळकर नवरा मेला, पोरगा मेला, सासरा मेला,जावई मेला तरी तीने हातात तलवार घेऊन २९ वर्षे राज्य चालवल.रेकार्ड आहे जगाच्या इतिहासात स्वतःच्या मनगटाच्या जोरावर २९ वर्ष राज्य चालवल.याचा अर्थ बायका कमजोर दिसतात पण त्या कमजोर नसतात. पाचवा गुण आहे प्रचार यंञणा – जर एखादी गौष्ट जर एखाद्या बाईला माहित झाली तर ती कमीत कमी पन्नासव जास्तीत जास्त १०० बायकाना सांगते आणि प्रत्येकीला म्हणते हे फक्त आपल्या दोघीच secret आहे. या पाच गुणांच्या बळावर त्या जग पादाक्रांत करू शकतात.महीलांनी या पाच गुणांचा योग्य वापर करून त्यांनी जग जिंकावे अशा त्यांना मनापासून शुभेच्छा!
