
बाभूळगाव ( प्रतिनिधी)अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलांची शासकीय निवासी शाळा बाभूळगाव ता येवला येथील निवासी शाळेत इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ नुकताच संपन्न झाला. सदरील निरोप समारंभासाठी या शाळेचे मुख्याध्यापक कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री राहुल वरकड हे होते. तसेच शिक्षक प्रतिनिधी श्री. महेश विंचू, श्री मिलिंद पानपाटील, श्री संजय सोनवणे,श्रीरंग सागरे, श्री दिपक उंडे, शिक्षिका प्रतिनिधी श्रीमती.अनुसया येळकर, श्रीमती.वसुंधरा रणमाळे, श्रीमती ताई चव्हाण, श्रीमती.जयश्री हिरे, आधी शिक्षक उपस्थित होते. यावेळी शाळेतील विद्यार्थी कु. मानस झाल्टे या विद्यार्थ्यांने मनोगत व्यक्त करताना निरोप समारंभाची सांगितले. त्याने वस्तीगृहातील चार ते पाच वर्षाचा अनुभव व्यक्त केला तसेच शिक्षकांनी खूप मेहनत घेऊन आम्हाला शिकवले. त्यांची मेहनत आम्ही वाया जाऊ देणार नाही. शाळेचा निकाल शंभर टक्के लावण्याची सर्व विद्यार्थ्यांनी निश्चित मेहनत घेतील. तसेच कु. प्रशिक बागुल, क्रिश पवार, सतीश बनसोडे, पृथ्वीराज चव्हाण, सिद्धार्थ गांगुर्डे, कुणाल मैंद, विशाल गरुड, यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले. शिक्षक प्रतिनिधी मध्ये श्री. महेश विंचू, श्री मिलिंद पानपाटील, श्री दिपक उंडे, श्रीमती वसुंधरा रणमाळे, तसेच मुख्याध्यापक श्री राहुल वरकड यांचे विद्यार्थी मार्गदर्शन असे भाषण झाले. भाषणात ते पुढे म्हणाले की सर्व विद्यार्थ्यांनी अभ्यासाचे व्यवस्थित नियोजन करावे. न घाबरता पेपर लिहावा. आत्मविश्वास ठेवा आपणास यश निश्चित मिळेल शेवटी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी इतर दहावीचे विद्यार्थ्यांकडून शाळेत घड्याळ भेट देण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती.अनुसया येळकर यांनी केले . तसेच प्रास्ताविक श्रीमती ताई चव्हाण यांनी केले तर शेवटी आभार श्री.मिलिंद पानपाटील यांनी मानले. तसेच कार्यक्रम सजावट श्रीमती.जयश्री हिरे यांनी केले.सदरील कार्यक्रमासाठी शालेय विद्यार्थी उपस्थित होते.

