
सिन्नर (प्रतिनिधी)आर एस एस चे भैय्या जोशी यांनी मुंबई मध्ये येऊन आपल्या अकलेचे तारे तोडले,मराठी भाषेचा अवमान करत, मुक्ताफळं उधळली, मुंबईत मराठी भाषा बोललीच पाहिजे असं काही बंधन नाही,कारण घाटकोपरची भाषा गुजराथी आहे,असे मराठी विरोधी बोलणाऱ्या भैय्या जोशींचा जाहीर निषेध करण्यात आला,पहील्या पासून मुंबई महाराष्ट्रापासून बाजूला करण्याचा अट्टाहास यापूर्वी अनेक मंडळांनी केला,तो डाव हाणून पाडण्यासाठी १०५ जनांनी आपल्या प्राणांची आहुती दिली,त्यात प्रत्येक जातीधर्माचे लोक सहभागी झाले होते,असे प्रतिपादन महामित्र दत्ता वायचळे यांनी केले,छत्रपती शिवाजी महाराज तसेच महापुरुषांचा अवमान या महाराष्ट्रात अनेक वाचाळवीर करतात त्याच बरोबर आता भाषांवर देखील लोक बोलायला लागलेत, यावेळी आदरणीय बाळासाहेब ठाकरे असते तर भैय्या जोशींची जीभ हसडून काढली असती अशा भावना माजी नगरसेवक किरण कोथमीरे यांनी व्यक्त केल्या,राजकारण्यांनी जातीपातीचे राजकारण न करता सर्वांनी एकत्रित काम केले पाहिजे असे आवाहन सुधाकर गुळे यांनी केले.महाराष्ट्रात कायद्याचा धाक आजिबात उरला नाही हे सिध्द झालं, कुणीही उठतं आणि महापुरुषांची बदनामी करत, राहूल सोलापूरकर, प्रशांत कोरटकर अबू आझमी आणि आता हे महाशय भैय्या जोशी हे तर डायरेक्ट भाषे वरचं बोलले, याचा अर्थ यांचा बोलविता धनी कोण आहे हे सर्व महाराष्ट्राच्या लक्षात आलं आहे, महाराष्ट्रात सर्व जातीधर्माचे लोक गुण्यागोविंदाने नांदतात हे ठराविक मंडळींना बघवत नाही, महाराष्ट्रात जाती जातींमध्ये,धर्मा धर्मामध्ये वाद कसें होतील, दंगली कशा घडतील हेच लक्ष या तथाकथित मंडळींच आहे,महागाईवर बोलायचं नाही, बेरोजगारीवर बोलायचं नाही, फक्त महाराष्ट्र पेटेल कसा हाच डाव ह्या मंडळींच्या डोक्यात आहे असा घणाघात काॅम्रेड हरिभाऊ तांबे यांनी केला,यावेळी राष्ट्रसेवा दलाचे,अजय शिंदे,उबाठाचे बलराम भंडारी,साजिद खतिब, सीटूचे हिरामण तेल्हुरे, गौरव भडांगे,सिराज शेख,शरद लोणारे, गोविंद बाकळे, प्रकाश माळी रविंद्र चौधरी,पवन भोळे, रविंद्र रनमाळे, नरेश पवार,मोशीन शेख,चंद्रभान रोडे, रविंद्र गायकवाड यांच्यासह अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
