
. **सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित २८३७ वा दिवस* आपण एखाद्या रेशमाच्या किड्यासारखे आपल्यातूनच धागा काढून त्याचा कोश विणीत बसतो. कालांतराने त्यातच बंदी होऊन जातो. एवढ्यानेही कुठे झाले आहे? अशा कोशातच आपल्याला आत्मसाक्षात्काराची प्रेरणा होते आणि सर्व प्रयत्नाने आपण मुक्ती प्राप्त करतो. कर्माचा कोश आपणच आपल्याभोवती विणीत असतो. अज्ञानामुळे आपल्याला वाटते की, आपण बंधनात आहोत आणि मग कोणीतरी सोडवावे म्हणून आपण आक्रंदन करतो. पण बाहेरून कोणाचे साहाय्य होणार नसते. ‘आत्मैव हि आत्मनो बंधुः।’ साहाय्य अंतर्यामीच असते. *स्वामी विवेकानंद…* *●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●**★ भारतीय सौर १५ फाल्गुन शके १९४६*★ फाल्गुन शुध्द /शुक्ल ७★ शालिवाहन शके १९४६★ शिवशक ३५१★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२६ ★ गुरुवार दि. ६ मार्च २०२५★ राष्ट्रीय दंतवैद्यक दिन. ★ १८४० बाल्टिमोर कॉलेज ऑफ डेंटल सर्जरी हे पहिले दंतवैद्यकीय महाविद्यालय सुरू झाले.★ १९५२ आचार्य अत्रे यांनी दिग्दर्शित केलेला ‘श्यामची आई’ चित्रपट प्रदर्शित झाला.★ १९८२ आदर्श लोकप्रतिनिधी खासदार रामभाऊ म्हाळगी यांचा स्मृतीदिन★ १९९२प्रसिध्द कादंबरीकार रणजीत देसाई यांचा स्मृतीदिन.

