

छावा” या चित्रपटाच्या शो प्रसंगी उपस्थित मविप्र संचालक रमेश आबा पिंगळे व सर्व मान्यवर ग्रामस्थ.
मखमलाबाद ( वार्ताहर ) = मराठ्यांचा जाज्वल इतिहास तसेच छत्रपती संभाजीराजांच्या शौर्याची गाथा सर्वांना माहीत व्हावी या उदात्त हेतूने मविप्र संचालक रमेश आबा पिंगळे व माजी सेवक संचालक डाॅ.अशोकराव पिंगळे यांच्या संकल्पनेतून “छावा” या ऐतिहासिक चित्रपटाच्या शोचे आयोजन नुकतेच मखमलाबादकरांसाठी करण्यात आले होते.या चित्रपटामुळे छत्रपती संभाजीराजांच्या जीवनातील अनेक महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना,अंगावर शहारे आणणारे थरारक प्रसंग तर काही प्रसंगात पाणावलेल्या डोळ्याच्या कडा याची अनुभूती सर्वांना आली.मविप्र संचालक रमेश आबा पिंगळे यांच्या स्वखर्चातून बिग बझारच्या सिनेमॅक्स थिएटरमधील २०० तिकीटांचे बुकींग करण्यात आलेले होते.अविस्मरणीय अशा “छावा” या ऐतिहासिक चित्रपटाचा अनुभव सर्वांनी सहपरिवार घेतला.याप्रसंगी उच्च माध्यमिक समिती अध्यक्ष पंडितराव पिंगळे,मखमलाबाद वाचनालयाचे अध्यक्ष रामदास पिंगळे,माजी मुख्याध्यापक अरुण पिंगळे,शिक्षक पालक संघाचे उपाध्यक्ष वाळु काकड,मविप्रचे जेष्ठ सभासद विश्वनाथ पिंगळे,चंद्रभान पिंगळे,पंढरीनाथ पिंगळे,मधुकर पिंगळे,दिलीपराव पिंगळे,प्रभाकर पिंगळे,शंकरराव फडोळ,वामनराव पिंगळे,रामदास पिंगळे,नरेंद्र मुळाणे,किसनराव पिंगळे,हरिभाऊ पिंगळे,बाळासाहेब मेहंदळे सर,बाळासाहेब पिंगळे,शिवाजी पिंगळे,राजेंद्र ढबले,बापु पिंगळे,दिलीप फडोळ,लक्ष्मण पिंगळे,शिवाजी हेंगडे,पत्रकार सुनिल बुणगे,विद्यालयाचे प्राचार्य संजय डेर्ले,अभिनव बालविकास मंदिर शाळेचे मुख्याध्यापक प्रमोद ठाकरे तसेच शालेय समिती सदस्य,मविप्रचे सभासद,हितचिंतक,ग्रामस्थ,शालेय कर्मचारी यांनी या चित्रपटाचा लाभ घेतला.
