
नाशिक (प्रतिनिधी)मराठा विद्या प्रसारक समाज नाशिक संस्थेतील सेवानिवृत्त झालेल्या ना.जि.म.वि.प्र. समाज निवृत्त सेवक संघातील सभासदांची वैद्यकीय तपासणी मातृसंस्थेचे माजी अध्यक्ष व माजी सरचिटणीस कर्मवीर अँड. बाबुरावजी गणपतराव ठाकरे यांच्या स्मरणार्थ त्यांच्या जन्मदिनी बुधवार दिनांक 12 मार्च २०२५ रोजी सकाळी ९.०० वाजेपासून डॉक्टर वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय व संशोधन केंद्र वसंतदादा नगर ,आडगाव, नाशिक येथे संपूर्ण दिवसभर आयोजित करण्यात आली आहे. मातृ संस्थेच्या सहकार्याने निवृत्त सेवक संघातील सभासदांची (पती-पत्नी) एकूण १० प्रकारच्या आरोग्य तपासण्या मोफत करण्यात येणार आहे. ना.जि.म.वि.प्र. समाज निवृत्त सेवक संघातील सभासदांनी याचा अवश्य लाभ घ्यावा. असे आवाहन संघाचे अध्यक्ष अँड. यु. आर . जाधव, उपाध्यक्ष श्री. एस. आर. पगार , सचिव कविवर्य, माणिकराव गोडसे, व सहसचिव श्र.एल. एस. तिडके आणि सर्व संचालकांनी केली आहे.
