
छत्रपती संभाजी नगर (प्रतिनिधी )डॉ. बाबा साहेब कॉलेज नागसेन नगर येथे फुले प्रेमी तसेच रंगला फुले प्रेमींचा काव्यजागर यात राज्यातून विविध जिल्ह्यातून फुले प्रेमी भिडे वाडाकार मा.विजय वडवेराव पुणे यांनी आयोजित केलेल्या या कार्यक्रमात अनेक सावित्रीच्यावेष भूषेत हजेरी लावली .स्त्री,पुरुषांनी पांढरे कुर्ता पायजमा परीधान केला होता . महाराष्ट्रात पुणे शहरासह अनेक जिल्ह्यात संविधान जागर प्रसार आणि महात्मा फुले विचार ही चळवळ चालू आहे . केळवद तालुका चिखली जिल्हा बुलढाणा येथील रहिवासी कवी शाहीर मनोहर पवार यांनी या राज्यस्तरीय भिडेवाडा काव्यसमेलनामध्ये सहभाग घेतला . महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले फातिमा बी यांच्या जीवन कार्यावर आधारित रचना – भिडे वाड्यात । भिडे वाड्यात । भरली पहिली शाळा । कसा फुलविला शिक्षणाचा मळा ।। हे स्वरूपाची रचना सादर केली . या प्रशिक्षणाला प्रचंड प्रतिसाद मिळाला . यावेळी अनेक जिल्ह्यातील नामवंत कवीने आपल्या रचना सादर केल्या . कवी मनोहर पवार यांनी अनेक काव्य संमेलनात साहित्य संमेलनामध्ये सहभाग नोंदविला आहे . गुजरात गोवा सह महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यामध्ये त्यांचा काव्यवाचनाचा कार्यक्रम सातत्याने होत आहे . राज्यात मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने सुद्धा काव्य वाचनाचा कार्यक्रम केला आहे . डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र भूमी मध्ये काव्य वाचनाचा योग आला हे मी माझे भाग्य समजतो . असे त्यांनी अभिमानाने सांगितले .
