
चांदवड( प्रतिनिधी). लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक यांनी 3 मार्च 2025 रोजी चांदवड तालुक्यातील तलाठी आणि एका खाजगी एजंटला लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले. या कारवाईत आरोपींनी वारसा हक्काने वाटणी झालेल्या शेतजमिनीच्या सातबारा उताऱ्यावर नोंद लावून देण्यासाठी लाचेची मागणी केली होती.घटना कशी घडली?तक्रारदार (वय 33) यांनी तक्रार दाखल केली होती की, ज्ञानेश्वर एकनाथ बरकले (वय 34, व्यवसाय-खाजगी एजंट, रा. परसुल, ता. चांदवड, जि. नाशिक) व विशाखा भास्कर गोसावी (वय 37, व्यवसाय- तलाठी, शेलु सजा, ता. चांदवड, जि. नाशिक) यांनी वारसा हक्काने वाटणी झालेल्या शेतजमिनीच्या सातबारा उताऱ्यावर नोंद लावण्यासाठी 8000/- रुपयांची लाचेची मागणी केली. तडजोडीनंतर लाचेची रक्कम 4000/- रुपये निश्चित करण्यात आली.लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून आरोपी क्रमांक एक व दोन यांना लाच घेताना रंगेहाथ पकडले. आरोपींच्या अंगझडतीत प्रत्येकी एक मोबाइल जप्त करण्यात आला असून, पुढील तपासणी सुरू आहे.लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची प्रभावी कारवाईया प्रकरणी चांदवड पोलीस स्टेशन येथे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम 1988 चे कलम 7अ आणि 12 अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.कारवाईमध्ये सहभागी अधिकारी:मार्गदर्शन:मा. श्रीमती शर्मिष्ठा घारगे-वालावलकर(पोलीस अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक परीक्षेत्र)सापळा अधिकारी / दाखल अधिकारी / तपास अधिकारी:श्री. संतोष पैलकर (पोलीस उपअधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक)सापळा पथक:पो.हे.कॉ. दिनेश खैरनार, अविनाश पवारचालक – पोलीस शिपाई परशुराम जाधव

