
सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित २८३५ वा दिवस
समाजाच्या अंतरंगात स्फुरण पावणाऱ्या अध्यात्मिक शक्तींचे प्रकट स्वरूप म्हणजे आरोग्यपूर्ण सामाजिक सुधारणा. अध्यात्मिक अंतःप्रवाह बलशाली असले म्हणजे समाजाचे बाह्य स्वरूप त्यानुसार आपोआप आकार घेते. प्रत्येक राष्ट्रातील सामाजिक व्यवस्था या त्या राष्ट्राला प्राणभूत असतात आणि इतरत्र असलेल्या व्यवस्थांच्या चौकटीत या राष्ट्रातील समाजाला बसवू म्हटले तर ते घातक ठरेल. त्या देशाला अनुरूप अशा नव्या सामाजिक व्यवस्था घडल्याशिवाय जुन्या व्यवस्था फेकून देणे हे हिताचे नाही. प्रगती, विकास, बदल हे सावकाशपणे होतात. देशातील माणूस बदलला, की देश आणि तेथील सामाजिक व्यवस्था बदलणे अपरिहार्य होते.
*स्वामी विवेकानंद...*
●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●
★ भारतीय सौर १३ फाल्गुन शके १९४६
★ फाल्गुन शुध्द /शुक्ल ५
★ शालिवाहन शके १९४६
★ शिवशक ३५१
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२६
★ मंगळवार दि. ४ मार्च २०२५
★ १९५१ नवी दिल्ली येथे राष्ट्रपती डॉ. राजेंद्रप्रसाद यांच्या हस्ते पहिल्या आशियाई खेळांचे उद्घाटन झाले. या खेळांत ११ देशांतील ४८९ महिला व पुरुष स्पर्धकांचा सहभाग होता.
★ २०११ केंद्रीय मानव संसाधन मंत्री, तीनवेळा मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री आणि पंजाबचे राज्यपाल काँग्रेस नेते अर्जुन सिंग यांचा स्मृतीदिन.
★ राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह.
