
लासलगाव ( प्रतिनिधी ) नूतन विद्या प्रसारक मंडळाचे, कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय लासलगाव येथील शिक्षिका प्रा.अश्विनी पवार यांना नाशिक जिल्हा मराठी अध्यापक संघ नाशिक यांच्याकडून कविवर्य कुसुमाग्रज शिक्षक सन्मान पुरस्काराने गौरवण्यात आले. प्रा.अश्विनी पवार यांनी शैक्षणिक क्षेत्रात मराठी भाषेबरोबरच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. तसेच त्यांनी शैक्षणिक क्षेत्रामध्ये वैशिष्ट्यपूर्ण अशा प्रकारचे योगदान दिले आहे. यासाठी त्यांना दिनांक २७ फेब्रुवारी २०२५ रोजी शिरवाडे वणी, तालुका-निफाड, जिल्हा नाशिक येथे कविवर्य कुसुमाग्रज शिक्षक सन्मान पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे.त्यांच्या पुरस्काराबद्दल संस्थेचे जनरल सेक्रेटरी माननीय श्री.गोविंदराव होळकर, प्राचार्य डॉ.आदिनाथ मोरे, उच्च माध्यमिक विभागाचे पर्यवेक्षक श्री.उज्वल शेलार तसेच महाविद्यालयीन सर्व शिक्षक परिवारातर्फे अभिनंदन करण्यात आले आहे.
