
पिंपळगाव बसवंत (प्रतिनिधी )-कुसूमाग्रजांच्या जन्मदिनी त्यांच्या जन्मगावी दिनांक २७ फेब्रूवारी २०२५ रोजीनाशिक जिल्हा मराठी अध्यापक संघाचा कविवर्य कुसुमाग्रज शिक्षक सन्मान सोहळा आयोजित केला होता. सौ.वैशाली शिंदे यांना सलग तीन वर्षे अखिल भारतीय संमेलनामध्ये कविता सादर करण्याचा बहुमान मिळाला आहे. सौ.वैशाली शिंदे ह्या जिल्हा परिषद शाळा पिंपळगाव बसवंत नं २ ता.निफाड येथे प्राथमिक शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. कविवर्य कुसुमाग्रज जयंती जागतिक मराठी राजभाषा गौरव दिन निमित्ताने आपल्या आखीवरेखीव ,भरीव सहशालेय शैक्षणिक उपक्रम राबविले.या उपक्रमशीलतेला अनुसरून कविवर्य कुसुमाग्रज सन्मान प्रदान करण्यात आला.दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे खासदार माननीय श्री . भास्कररावजी भगरे सर व नाशिक विभाग पदवीधर मतदार संघाचे आमदार मा.श्री सत्यजितजी तांबे सर यांच्या हस्ते कविवर्य कुसुमाग्रज सन्मान प्रदान करण्यात आला. यावेळी नाशिक विभाग पदवीधर मतदार संघाचे आमदार श्री.सत्यजित तांबे यांनी संबोधले की, कुसुमाग्रजांच्या नावे त्यांच्या जन्मदिनी, त्यांच्या गावी उपक्रमशील शिक्षकांना कुसुमाग्रज शिक्षक सन्मान पुरस्कार देऊन शिक्षकांना प्रेरणा देण्याचे काम आयोजकांनी केले आहे .कुसुमाग्रज सन्मान हा शिक्षकांसाठी प्रेरणादायी असून उपक्रमशील शिक्षकांना प्रोत्साहित करणारा आहे. कुसुमाग्रजांना अभिवादन करताना नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघाचे आमदार मा.सत्यजित तांबे म्हणाले की,कुसुमाग्रज हे साहित्य क्षेत्रातील सूर्याप्रमाणे चमकणारा तारा आहे.कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री. गौतम पाटील हे होते .प्रमुख अतिथी म्हणून दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे माननीय खासदार श्री. भास्करराव भगरे सर होते .संस्थेचे अध्यक्ष श्री. सुरेश सलादे सर, उपाध्यक्ष प्राध्यापक विजय पवार सर, सल्लागार प्राचार्य शिवाजीराव पवार सर, तसेच कादवा सहकारी साखर कारखाना व्हाइस चेअरमन श्री . शिवाजीराव बस्ते श्री.बापूसाहेब पाचोरकर , पिंपळगाव बसवंत येथील सामाजिक कार्यकर्ते श्री.बापूसाहेब पाटील, शिरवाडे वणी येथील कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री. शरद काळे व सरपंच उपसरपंच व श्री.भाऊसाहेब भालेराव उपस्थित होते.राज्य शिक्षक समितीचे अध्यक्ष श्री.काळूजी बोरसे सर ,श्री देवेंद्र वाघ सर ,श्री. देशमाने सर श्री.शिवाजी शिंदे सर आदी मान्यवर उपस्थित होते. श्री. सुरेश सलादे सर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले .सरचिटणीस श्री. सतिष सोनवणे ,चिटणीस प्राचार्य महेश वाघ ,प्राध्यापक दिनकर रसाळ ,डॉ.समाधान गांगुर्डे ,प्राध्यापक ज्ञानेश्वर कावळे, प्राचार्या जयश्री पवार, सौ मृणाल वैद्य, श्रीमती सरला जाधव मॅडम आणि सर्व विश्वस्त मंडळ नाशिक जिल्हा मराठी अध्यापक संघ उपस्थित होते. श्रीमती कावळे मॅडम, श्रीमती मोरे मॅडम ,कुमारी सानिका खैरे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.श्री सतीश सोनवणे सर व श्री दिनकर रसाळ सर यांनी उपस्थितांचे आभार मानले.सौ.वैशाली शिंदे या उदयोन्मुख लेखिका, कवयित्री, पत्रकार असून *कलाटणी* हा त्यांचा कवितासंग्रह प्रकाशित झाला आहे .आतापर्यंत विविध पुरस्काराने त्या सन्मानित झालेल्या आहेत. विविध वृत्तपत्रांत सदर लेख प्रकाशित आहेत. कथा ,कविता,अलक लेखन लेख, ललित लेख बालकाव्य अशा विविध प्रकारात त्यांचे लेखन प्रकाशित झालेले आहे .आतापर्यंत अनेक वृत्तपत्रे,दिवाळी अंक, शिक्षक मित्र मासिक यातून त्यांच्या साहित्याला प्रसिद्धी मिळाली आहे. रेडिओ पुणेरी आकाशवाणी वर अलक ची झलक व हा खेळ शब्दांचा या शो मधून त्यांच्या अनेक रचना प्रसारित झालेल्या आहेत. या निवडीबद्दल पंचायत समिती निफाड चेगटशिक्षणाधिकारी आदरणीय श्री.प्रशांत गायकवाड साहेब,पंचायत समिती निफाड शिक्षणविस्तार अधिकारी (पिंपळगाव बीट) आदरणीय सौ.लता भरसट मॅडम, पिंपळगाव बसवंत केंद्राच्या प्रभारी केंद्रप्रमुख आदरणीय सौ.शोभा सावकार मॅडम, जिल्हा परिषद शाळा पिंपळगाव बसवंत नं २ च्या मुख्याध्यापिका आदरणीय सौ.अनुराधा महाडिक मॅडम व सर्व शिक्षक वृंद यांनी अभिनंदन केले, तसेच सर्व आप्तेष्ट, नातेवाईक सगेसोयरे ,मित्रपरिवार विविध स्तरांतून त्यांचे अभिनंदन होत आहे.
