
मांडवड( प्रतिनिधी )स्व. शरद अण्णा आहेर जनता विद्यालय, मांडवड विद्यालयाचे नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेतून सुयश नुकत्याच जाहीर झालेल्या जवाहर नवोदय विद्यालय इयत्ता सहावी वर्गासाठी प्रवेश परीक्षेमध्ये म.वि.प्र.संचलित स्व. शरद अण्णा आहेर जनता विद्यालय, मांडवड विद्यालयातील कुमार करण भास्कर आहेर व कुमार वरुण रवींद्र आहेर* या दोन विद्यार्थ्यांचा नवोदय विद्यालयात प्रवेश परीक्षेमध्ये पात्र झाले व विद्यालयात घवघवीत असे यश मिळवून दिले. सदर विद्यार्थ्यांना करुनेश्वर महादेव आश्रम,जोंधळवाडी येथील महामंडलेश्वर* यांचे मार्गदर्शन तसेच विद्यालयाचे उपशिक्षक श्री.मोरे एन.के. श्रीम.सौंदाणे जे.सी. श्री. चौधरी सी.एस. यांचे मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल *म.वि.प्र. नांदगाव तालुका संचालक मा.श्री.अमित भाऊ बोरसे पाटील*, शालेय स्कूल कमिटी अध्यक्ष श्री.प्रशांत भाऊ आहेर* *मुख्याध्यापक श्री. कवडे आर. आर.* यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
