
ओझर: दि.१५ वार्ताहर
येथील ‘मविप्र’ संचालित माधवराव बोरस्ते विद्यालयात भगवान बिरसा मुंडा जन्मशताब्दी अर्थात जनजाती गौरव दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. मुख्याध्यापक सोपान वाटपाडे यांनी भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन केले. याप्रसंगी विद्यालयाचे उपमुख्याध्यापक सतीश केदार पर्यवेक्षक दशरथ शिंदे दादासाहेब सोनवणे प्रभाकर लवांड महेंद्र डांगळे संगीता शेटे मंगल सावंत रेखा देशमाने शितल हांडोरे आदी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.सूत्रसंचालन क्रीडा शिक्षक उज्वला जाधव यांनी केले. फलकलेखन कला शिक्षिका सविता पवार मोनाली निकम यांनी केले.आभार शिक्षिका शकुंतला आगळे यांनी केले
