
मोरेवाडी ( प्रतिनिधी )जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मोरेवाडी येथे भगवान बिरसा मुंडा यांची”१५० वी”जयंती जनजाती गौरव दिवस म्हणून साजरी करण्यात आली.सर्वप्रथम भगवान बिरसा मुंडा यांच्या फोटोचे पूजन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.मुख्याध्यापक बागुल सर यांनी भगवान बिरसा मुंडा यांनी आदिवासी वनजमिनीच्या रक्षणासाठी इंग्रजांविरुद्ध केलेल्या उठावाची माहिती दिली.समाजाने त्यांना जननायक ही पदवी दिली असे आपल्या भाषणात नमूद केले.याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून काळू भिवसन मोरे,शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर तुकाराम मोरे,नवभारत साक्षरता स्वयंसेवक ज्ञानेश्वर रूपचंद सोनवणे,पालक काभू रतन मोरे,स्वयंपाकी जिभाऊ पांडुरंग मोरे,मुख्यमंत्रीयुवा प्रशिक्षणार्थी शितल सुभाष मोरे,मुख्याध्यापक बागुल सर,उपशिक्षिका योगिता कापुरे मॅडम उपस्थित होत्या.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्याध्यापक बागुल सर यांनी केले,तर योगिता कापुरे मॅडम यांनी उपस्थितांचे आभार मानले.
